April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

जातीचे प्रमाणपत्र तसेच अन्‍य आवश्‍यक प्रमाणपत्र जलदगतीने मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने कर्मचारीवृंद वाढवत योग्‍य व्‍यवस्‍था करण्‍याची भाजपाची मागणी

जातीच्‍या प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्‍यानंतर मिळणारी पोचपावती उमेदवारी अर्ज भरताना ग्राहय धरावी

भाजपा पदाधिका-यांचे जिल्‍हाधिका-यांना निवेदन सादर

 

ग्राम पंचायत निवडणूकीसाठी जातीचे प्रमाणपत्र तसेच अन्‍य आवश्‍यक प्रमाणपत्र जलदगतीने मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने कर्मचारीवृंद वाढवत योग्‍य व्‍यवस्‍था करण्‍याची मागणी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात भाजपा पदाधिका-यांच्‍या शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिका-यांकडे केली.

 

दिनांक 17 डिसेंबर रोजी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात भाजपा पदाधिका-यांच्‍या शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांची भेट घेत निवेदन सादर केली. यावेळी जिल्‍हाधिका-यांशी चर्चा करताना देवराव भोंगळे म्‍हणाले, राज्‍यात ग्राम पंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जा‍हीर करण्‍यात आला आहे. इच्‍छूक उमेदवार आवश्‍यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्‍यात व्‍यस्‍त आहेत. अवधी कमी असल्‍यामुळे कर्मचारीवृंद कमी आहे अशी कारणे सांगून टाळाटाळ होत असल्‍याचे प्रकार प्रशासनाच्‍या स्‍तरावर निदर्शनास येत आहेत. यामुळे भ्रष्‍टाचार सुध्‍दा वाढीस लागण्‍याची शक्‍यता आहे. हे सर्व टाळण्‍याच्‍या दृष्‍टीने व आवश्‍यक कागदपत्रे उमेदवारांना जलदगतीने उपलब्‍ध होण्‍यासाठी योग्‍य व्‍यवस्‍था करण्‍याची आवश्‍यकता आहे. प्रामुख्‍याने ग्राम पंचायत निवडणूकीसाठी उमेदारांना कोणकोणती कागदपत्रे आवश्‍यक आहेत याची विस्‍तृत माहिती देण्‍यात यावी. ही कागदपत्रे जलदगतीने उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने कर्मचारीवृंद वाढविण्‍यात यावा. दुस-या विभागाचा कर्मचारीवृंद सदर विभागाला देण्‍यात यावा. विशेष महत्‍वाचे म्‍हणजे जातीच्‍या प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्‍यानंतर मिळणारी पोचपावती उमेदवारी अर्ज भरताना ग्राहय धरण्‍यात यावी अशी मागणी सुध्‍दा त्‍यांनी यावेळी केली.

 

याबाबत सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांनी शिष्‍टमंडळाला दिले. शिष्‍टमंडळात जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, जिल्‍हा भाजपाचे सरचिटणीस नामदेव डाहूले, महानगर भाजपा सरचिटणीस ब्रिजभूषण पाझारे, कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे उपसभापती रणजीत डवरे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

Advertisements
error: Content is protected !!