April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

धनलक्ष्मी फायनान्स कंपनी कडून जनतेची फसवणूक..रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

चंद्रपूर : वडगाव पोलीस चौकीजवळ असलेल्या धनलक्ष्मी फायनान्स सर्वीसेस कंपनीचे कार्यालय स्थापन करून विविध प्रकारचे कर्ज मिळवून देण्याचे आमीष देऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची धनलक्ष्मी फायनान्स कंपनी चे संचालक प्रवीण सोळंकी रा. भद्रावती यांनी फसवणूक केली असून रामनगर पोलीसांत शेतकर्‍यांना आज तक्रार देताच गुन्हा दाखल केला आहे.

 

धनलक्ष्मी फायनान्स सर्वीसेस कंपनीच्या संचालकाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यात व स्थानिक ठिकाणी नागरिकांना कर्जाची आमीष दाखवून त्यांच्याकडून डॉकूमेंट चार्ज, प्रोसेसिंग फि च्या नावाखाली लाखो रूपये वसूल करून कर्ज मिळवून देतो म्हणून, वर्षाभरापासून संबंधीत नागरिकांना भूलथापा देत होता. दरम्यान, फिर्यादी दिगांबर आत्राम, रा. नगीनाबाग वार्ड यांची धनलक्ष्मी फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाकडून १५ लाख कर्ज मिळवून देतो म्हणून त्यांच्याकडून डॉकूमेंट चार्ज, प्रोसेसिंग फि च्या नावाखाली लाखो रूपये विविध स्वरूपात एकूण ५ लाख रूपयांनी फसवणूक केली.

 

अशाप्रकारे जिल्ह्यातील नंदकीशोर पेंदाम, रा. भद्रावती १ लाख ६५ हजार, राजू गोरे ३९ हजार, रा. कथलाबोडी, ता. कोरपना, अरविंद माथनकर, रा.उमरी, ता.वरोरा २५ हजार, प्रमोद पेटकर, रा. वडधा, ता.वरोरा २५ हजार, नथ्थू मोडक, तातेराव कांबळे, नामदेव गायकवाड, किसन शिंदे, रेश्मा खंडारे, रसूल सय्यद, गोपीनाथ गायकवाड, संभा यानकुडके, लक्ष्मी तोगरे, राजेंद्र लोहकरे आदी कडून विविध स्वरूपात आरोपीने एकूण १३ लाख ७९ हजार ५०० रूपयांनी फसवणूक केली.

रामनगर ठाणेदार प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!