
दिनांक 15 च्या राजौ १०.३० वा. च्या सुमारास अजयपुर जवळ झालेल्या भिषण अपघाता मध्ये मूल शहरातील वेगवेगळ्या चार प्रतिष्ठीत कुटूंबातील चार युवकांचा मृत्यु झाला यामध्ये राजुभाऊ पटेल आणि सलीम शेख यांचे प्रत्येकी एक असे दोन मूल आणि विष्णु उधवाणी आणि निमगडे शिक्षक यांचे प्रत्येकी एक प्रमाणे दोन मूलीचा समावेश. या चारही जणांना घटनास्थळीच मृत्युने कवटाळले. हिरेणभाऊ शाह (गोगरी) यांचा मूलगा योग गोगरी गंभीर जखमी. चंद्रपूर वरून वाढदिवस साजरा करून येत होते हे पाचही जण. शेतामधुन निघणाऱ्या ट्रॅक्टरने केला चौघाचाही घात केला असल्याचे बोलले जात आहे. चौघांच्याही आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या अपघाती मृत्युने चारही कुटूंबिया वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातची राम नगर पोलिस तपास करित आहे.
More Stories
राम नगर पुलिसांनी अवैध दारूविक्री ची ‘ऑल आऊट मोहीम सुरू
महिला ‘पीएसआय’वर लग्नाचे आमिष दाखवून सहकारी एपीआयचा बलात्कार; डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल व पुढील तपास पोलिस करीत आहे
अवैध रेती वाहतूकदारावर कारवाई