April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

ज्‍युबिली हायस्‍कुलच्‍या नूतनीकरणाच्‍या तसेच वीर बाबुराव शेडमाके इनडोअर स्‍टेडियमच्‍या बांधकामाचा मार्ग सुलभ

सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्‍या निविदा प्रकाशित

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत

महाराष्‍ट्र विधान परिषदेच्‍या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्‍या निवडणूकीत मतदान करण्‍यासाठी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरातील ज्‍युबिली हायस्‍कुल येथील मतदान केंद्रावर पोचले. मतदान केल्‍यानंतर आ. मुनगंटीवार बालपणाच्‍या आठवणीत रमले. तब्‍बल अर्धातासाहून अधीक वेळ त्‍यांनी शाळेची पाहणी केली.

आ. सुधीर मुनगंटीवार याच ज्‍युबिली हायस्‍कुलचे विद्यार्थी. आजचा सुविचार असे लिहीलेल्‍या फळयाकडे बघताना ते आठवणींचया फॅशबॅकमध्‍ये गेले. 1906 मध्‍ये स्‍थापना झालेल्‍या या शाळेत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी, रज्‍जुभय्या, माजी केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री शांतारामजी पोटदुखे यांच्‍यासारखे मान्‍यवर याच शाळेचे विद्यार्थी होते. एकेकाळी शैक्षणिक वैभवाची साक्षीदार असलेली ही शाळा आज ओसाड पडत चालली आहे. या शाळेला गतवैभव प्राप्‍त करून देण्‍यासाठी हे मैदान पुर्ववत करण्‍याची या शाळेचे नुतनीकरण करण्‍याची आवश्‍यकता सुध्‍दा यावेळी आ. मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली. अर्थमंत्री असतानाच त्‍यांनी ज्‍युबिली हायस्‍कुलच्‍या नूतनीकरणासाठी 8 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. 11 सप्‍टेंबर 2019 रोजीच्‍या शासन निर्णयानुसार हा निधी त्‍यांनी मंजूर केला. त्‍यासोबतच ज्‍युबिली हायस्‍कुल परिसरात वीर बाबुराव शेडमाके इनडोअर स्‍टेडियमचे बांधकाम करण्‍यासाठी 25 कोटी रू. निधी मंजूर केला होता.

पदवीधर मतदार संघाच्‍या मतदानाच्‍या दिवशी या शाळेसंबंधीच्‍या आठवणीत रमलेल्‍या या लोकप्रतिनिधीने आपल्‍या शाळेला गतवैभव प्राप्‍त करून देण्‍यासाठी आधीच निधी मंजूर केला होता. मतदानाच्‍या दिवसानंतर 10 दिवसातच या दोन्‍ही कामांच्‍या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिध्‍द केल्‍या आहेत. आता ज्‍युबिली हायस्‍कुलचे नुतनीकरण तसेच वीर बाबुराव शेडमाके इनडोअर स्‍टेडियमचे बांधकाम या दोन्‍ही कामांचा मार्ग सुलभ झाला आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने होवू घातलेल्‍या या दोन्‍ही कामांच्‍या माध्‍यमातुन चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या शैक्षणिक क्षेत्राचा मानबिंदू समजल्‍या जाणा-या ज्‍युबिली हायस्‍कुलला गतवैभव प्राप्‍त होणार आहे. ज्‍युबिली हायस्‍कुलच्‍या नुतनीकरणामध्‍ये दरवाजे, खिडक्‍यांची दुरूस्‍ती, नविन फलोरींग करणे, नविन छत व फॉल सिलींग करणे, आवश्‍यक ठिकाणी प्‍लॉस्‍टर करणे व रंगरंगोटी करणे, ऑकोस्‍टीक सिलींग, पुरूष व स्‍त्रीयांकरीता स्‍वतंत्र शौलयाचे बांधकाम करणे, डिजीटल क्‍लासरूम व आधुनिक फर्नीचर, प्रयोगशाळेची दुरूस्‍ती करणे या कामांचा अंतर्भाव आहे.

Advertisements

1858 च्‍या स्‍वातंत्र्य लढयात ब्रिटीशांशी निकराने झुंज देणारे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ ज्‍युबिली हायस्‍कुल परिसरात इनडोअर स्‍टेडियम बांधण्‍यात येत आहे. 25 कोटी रू. किंमतीच्‍या या इनडोअर स्‍टेडियममध्‍ये 2000 प्रेक्षकांची क्षमता असणार आहे. सर्व प्रकारच्‍या खेळांसाठी आवश्‍यक सुविधा याठिकाणी उपलब्‍ध होणार असून ज्‍युबिली हायस्‍कुलचे मैदान या माध्‍यमातुन नवे रूप धारण करणार आहे. एखाद्या विद्यालयातून एक विद्यार्थी शिक्षण घेतो, त्‍या शाळेच्‍या संस्‍कारातून त्‍याची जडणघडण होते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात हा विद्यार्थी अग्रेसर ठरतो. या शाळेविषयीची कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी त्‍याने या शाळेचे नुतनीकरण, इनडोअर स्‍टेडियमचे बांधकाम यासाठी पुढाकार घेत शाळेचे गतवैभव तिला मिळवून देण्‍यासाठी पुढाकार घेणे हा भाग आजच्‍या प्रॅक्‍टीकल जगात मात्र विरळाच आहे. हा पुढाकार घेणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करावे तेवढेच कमीच आहे.

Advertisements
error: Content is protected !!