April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

ताडोबा अभयारन्य लगतच्या गावातील बांबु कारागिरांच्या समस्या सुटणार :- पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर लगतच्या बोर्डा, निंबाळा, वायगांव, घंटा चैकी, झरीपेठ, पहामी, हळदी, मोहुर्ली, देवाडा, अडेगांव, आगरझरी, जूनोना, डोणी आदि गावांमधील बांबु नागरीकांचा बांबू पासून वस्तू तयार करण्याचा प्रमुख व्यवसाय असून या बांबू कारागीरांना मागील दिड वर्शांपासून वनविभागामार्फत बांबू उपलब्ध होत नसल्याने असंख्य कारागीरांचा रोजगाराचा प्रष्न निर्माण झालेला आहे. पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या कारागीरांच्या समस्या लक्षात घेवून असंख्य गावकऱ्यांसोबत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगांवकर यांचेषी भेट घेवून चर्चा केली व बांबू कारागीरांना तातडीने बांबू उपलब्ध करणे व इतर समस्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी प्रदेष भाजपाचे सदस्य खुशाल बोंडे, अनंत ठाकरे, अनिल रायपूरे, आत्माराम तावाडे, बाळू सागोरे, यषवंत मांडवकर, प्रमोद देवगडे, भगवान चांदेकर, बारसागडे उपस्थितीत होते.

 

 

12 महिने बांबू उपलब्ध करुन देणे, कारागीरांवर ठराविक वस्तू तयार करण्याचे कोणतेही   बंधन नसावे, जास्तीत जास्त बांबू उपलब्ध करुन देणे, परवानगी घेवून वाहतूक करणाऱ्या गाड्यांची अडवणूक करु नये, गावातील कारागीरांना गावात वस्तू निर्मिती चे प्रषिक्षण देणे या मागयांवर ही अहीर यांनी चर्चा केली.

डाॅ. रामगांवकर यांनी येत्या दोन-तीन दिवसांत बांबू उपलब्ध करुन देणार असून कारागीर कोणत्याही वस्तू तयार करु षकतील त्यावर कोणतेही बंधने राहणार नाही, गावातील कारागीरांच.ी नांवे उपलब्ध करुन दिल्यानंतर गावात त्यांना प्रषिक्षण देण्याचे आष्वासन यावेळी त्यांनी अहीर यांना दिले. यावेळी ताडोबा प्रकल्पाअंतर्गत येत असलेली बोर्डा, निंबाळा, वायगांव, घंटा चैकी, झरीपेठ, पहामी, हळदी, मोहुर्ली, देवाडा, अडेगांव, आगरझरी, जूनोना, डोणी आदि गावातील अंकूष झांकर, गुरुदास भोई, बाबुलाल नागवंषी, बोलबो विषाल, चेतन भोई, रावजी खैरवार, मारोती सुरपाम, चंदू चैधरी, राकेष कुमरे, राहूल कुळमेथे, सुरेष आत्राम, रामा आलाम, रमेष टेकाम, श्रीहरी सोयाम, संतोश दुपारे, गणेष किन्नाके, मिथून घोडाम, अषोक गावडे यांचसह असंख्य बांबू कारागरीर व ग्रामस्थ मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित होते

 

Advertisements
error: Content is protected !!