April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

वनरक्षकासह दलाल पोलिसांच्या ताब्यात क्षेत्रसंचालकांनी आणले उघडकीस

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात परवानगी नसलेल्या पर्यटकांना जास्तीची रक्कम घेवून अवैधरित्या जंगल भ्रमंती घडविणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात ताबा व्यवस्थापनाला यश आले आहे. खुद्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांळा रचून या गैरप्रकाराचा भांडाफोडके केली

ताडोबात सुरू असलेल्या या गोरखधंद्याची तक्रार चिमुर पोलिसात नोंदवली गेली. चिमूर पोलिसांनी वनरक्षक टेकचंद सोनुले व खडसंगी येथील दलाल सचिन कोयचाडे यांना ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी वनरक्षक सोनुले यांच्यावर कायमस्वरूपी निलंबनाची कार्यवाही केली जाण्याची शक्यता वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश शेंडे यांनी व्यक्त केली आहे. या घटनेचा तपास चिमूर पोलिस करीत आहेत. वृत्तलिहिस्तोवर गैरव्यवहार करणार्‍या वनरक्षकासह दलाला अटक दाखविण्यात आली नव्हती. बुधवारी दुपारपर्यंत त्यांना अटक करू, अशी माहिती चिमूर पोलिसांनी दिली.

Advertisements
error: Content is protected !!