April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

डॉ. शीतल आमटे यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

चंद्रपूर – ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या CEO डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेवून शीतल आमटे यांनी जीवन यात्रा संपवली आहे.

डॉ. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला.

शीतल आमटे यांनी आज सकाळी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. शीतल आमटे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

Advertisements

काही दिवसांपूर्वी शीतल आमटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महारोगी सेवा समितीच्या लोकांवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर डॉ. विकास, प्रकाश, मंदा आणि भारती यांनी पत्र काढून त्यांचे आरोप फेटाळले होते. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.

 

Advertisements
error: Content is protected !!