April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे भव्य रक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबीराचे आयोजन

150 पोलीस अधिकारी अंमलदार आणि नागरीकांनी घेतला सहभाग

मुंबई येथील २६/११ या आतंकवादयांच्या भ्याड तल्लयात शहिद झालेल्या विरांना श्रध्दांजली म्हणुन दिनांक २८/११/ २०२० रोजी या शहिद दिनाचे औवित्य साधुन पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे भव्य रक्तदान व प्लाझ्मा दान शबीराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात बल्लारशाह येथील पोलीस अधिकारी आणि अमलदार तसेच स्थानिक नागरीकांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.

सदर शिवीरात एकुण १४८ पोलीस अधिकारी, अमंलदार आणि स्थानिक नागरीकानी सहभाग घेतला असुन सदर शिबीरातील उपस्थितांना रक्तदान केल्याने काय फायदे आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रक्तदान केल्यामुळे एखादया गरजु व्यक्तींना याचा लाभ होउ शकेल. तसेच कोरोनाग्रस्त व्यक्तींना प्लाइमादान करून त्यांचे प्राण सुध्दा कशा प्रकारे वाचविण्यात येवु शकते याबाबत सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. आणि याचा फायदा गरजूंना नक्कीच होईल या उददेशातुन सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यापुढेही अशा प्रकारचे उपकम/शिबीर पोलीस विभागातर्फे घेण्यात येईल तरी सर्व नागरीकांनी ब्लड आणि प्लाइमा दान करून एक सामाजीक जबाबदारी पार पाडावी असे आवाहन करण्यात येत आहे.

सदर कार्यकमात पोलीस अधीक्षक  अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक . प्रशांत खरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदुर/ राजुरा  सुशिलकुमार नायक यांचे नेतृत्वात .

पुलिस निरिक्षक उमेश पाटील यांचे सह पोलीस स्टेशन बल्लारशाह येथील अधिनस्त अधिकारी आणि अंमलदार यांनी महत्वाची भुमिका बजाविलो.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!