
युतीच्या काळात बांधकामाला प्रारंभ
आघाडीच्या काळात खड्यावर खङ्ङे
: चंद्रपूूूूर गेल्या दोन वर्षापासुन सुरू असलेले मुल रोडचे काम अद्यापही पुर्ण झालेले नसून कामाची गती अतिशय संथ असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील हॉटेल सिध्दार्थ आणि रामनगर पोलीस स्टेशन समोर गेल्या अनेक दिवसांपासुन रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. यातच रस्त्याचे काम अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नागरीकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाने बंगाली कॅम्प मार्गे मुल आणि बल्लारपुरकडे करण्याकरीता रस्ता खोदला असून जड वाहनांची सतत वर्दळ असते. काम कासवगतीने सुरू आहे. तसेच तुकूम, नेहरू नगर दुर्गापुर नागरिकांची गैरसोय लक्षात घेता बांधकाम तातडीने करण्याची मागणी होत आहे. युती सरकारच्या काळापासून रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. मात्र त्या सरकारने पुढाकार घेवून रस्ता परिपुर्ण केला नाही. यामुळे रस्त्यावर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देवून रस्त्याचे काम त्वरीत होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
More Stories
भद्रावती पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याची दारू, जुगार, सट्टा व सुगंधीत तंबाखू धंदेवाईकांकडून लाखोंची हप्ता वसुली?
ढोरवासा केंद्रप्रमुखाकडून सावित्रीच्या लेकींचा सत्कार भद्रावती,दि.१९
अवैध रेती वाहतुक करणाऱ्या वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही