April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

मनसेच्या वीज दरवाढ विरोधातील मोर्चाला मिळाला मोठा प्रतिसाद,

जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते व वीज ग्राहकांची उपस्थिती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेचे कोरोना संकट काळात वाढविलेले जवळपास २० टक्के वीज बील कमी करण्यात यावे याकरिता राज्याचे राज्यपाल यांना निवेदन दिले होते व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पण निवेदन दिले पण राज्याचे महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बील संदर्भात कुठलाही निर्णय न करता उलट आता जनतेने वापरलेल्या वीज बिलाची रक्कम भरा अन्यथा वीज कनेक्शन कंपन्यात येईल असे आदेश काढले होते, त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरून सर्वसामान्यांना वीज बीलात सूट मिळावी म्हणून राजसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून सरकारचा निषेध करण्याचे आवाहन मनसे पदाधिकारी याना केले होते.

चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या नेत्रुत्वात चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसे तर्फे महामोर्च्या आज दिनांक २६ नोव्हेंबर ला काढण्यात आला, संजय गांधी मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा दरम्यान “महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद, वाढीव वीज बिल माफ झालेच पाहिजे” अशा घोषणा मनसे कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या, या मोर्चाला मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, प्रशांत कोल्हे, आनंद बावने, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, महालिंग कंठाळे,मनोज तांबेकर, राजू बघेल ,आकाश भालेराव, रमेश कालबान्दे, भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, कृष्णा गुप्ता,कुलदीप चंदनखेडे, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर , विवेक धोटे, वैभव डहाणे, सचिन गाते,सूरज शेंडे,राजू गड्डम , आकाश तिरुपतीवार, आशिष नैताम, कल्पना पोतर्लावार,

Advertisements
error: Content is protected !!