April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

बल्लारपूरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घाला:-राजु झोडे

पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हेगारी कमी करण्याची केली मागणी

मागील काही दिवसांपासून बल्लारपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेली असून दररोज गुन्हेगारीच्या घडामोडी घडत आहेत.बल्लारपूर शहरात गुंडगिरीची पार्श्वभूमी असलेल्या अनेकांच्या घरी तलवारी, बंदुका, खंजर यासारखे जीवघेणे शस्त्र असल्याची चर्चा आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील येथे रुजू झाल्यापासून त्यांनी शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचा यशस्वी प्रयत्न चालवला असला तरी अपुऱ्या पोलीस संख्याबळामुळे त्यांना काम करण्यास अडचणी येत आहेत. बल्लारपूर शहरातील लोकसंख्या आणि वाढती गुन्हेगारी बघता तिथे पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या घरी धाडसत्र मोहीम राबवून त्यांच्याकडील शस्त्रसाठा जप्त करणे आवश्यक आहे. बल्लारपूर शहरात भविष्यात गुन्हेगारीतुन कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा बळी जाऊ नये यासाठी आपण या विषयावर गंभीरता पूर्वक लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई करावी व संबंधित मागणी मान्य करावी करिता उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन दिले. निवेदनात वरील मागणी पूर्ण करून तात्काळ चंद्रपूर जिल्ह्यातील व बल्लारपूरातील गुन्हेगारी कमी करावी अशी मागणी केली. निवेदन देताना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, जिल्हा संयोजक प्रशांत उराडे, प्राध्यापक प्रमोद शंभरकर, गुरु कामटे, मल्लेश मुद्रिकवार उपस्थित होते.

Advertisements
error: Content is protected !!