April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

ऑनलाईन फसवणुकीपासुन सावध… बनावट फेसबुक आयडी तयार करून फसवणुकीचा प्रयत्न.

सायबर गुन्हेगारांचा चंद्रपुर जिल्हा पोलिस अधीक्षकांना फटका, पोलीस अधीक्षकांच्या नावानी बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पैशांची लोकांकडे केली मागणी, लोकांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या कडे फोन करून विचारणा केल्यावर झाला खुलासा, या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

 

चंद्रपूर पोलिसांचा सायबर गुन्हे शाखा विभाग अतिशय सक्षम समजला जातो. आजवर सायबर गुन्हे शाखेने अनेक क्लिष्ट प्रकरणे उजेडात आणली आहेत. तर शेकडो प्रकरणात आरोपींना जबर शिक्षा झाली आहे. मात्र ताजा गुन्हा चक्क जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांच्या बाबतीतच घडला आहे. सायबर गुन्हेगारांनी चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांच्या नावाचे बनावट फेसबुक आयडी तयार करत लोकांना त्यावर जोडणे सुरू केले आहे. या फेसबुक खात्याच्या माध्यमातून नागरिकांना पैशाची मागणी केली जात असून त्यासाठी विविध कारणे पुढे केली जात आहेत. दरम्यान अशा प्रकारे पैशाची मागणी करणारे काही कॉल्स या फेसबुक अकाउंटशी जोडले गेलेल्या नागरिकांना आल्यानंतर त्यांनी खुद्द पोलीस अधीक्षकांना याची माहिती दिली. त्यातून हा प्रकार उजेडात आला आहे.

चंद्रपूर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने या सायबर गुन्हेगारांनी विरोधात आता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून असे बनावट फेसबुक खाते तयार करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. गेले काही दिवस आधीच मित्र असलेल्या अनेक फेसबुक खातेदारांना मध्ये पुन्हा पुन्हा नव्या खात्याच्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट येत असून त्यामुळे फेसबुक वापरकर्त्यात संभ्रम निर्माण झाला आहे. ताजा प्रकार याच मालिकेत झाला असून पोलिसांनी मात्र एकदा फ्रेंड असलेल्या मित्राची पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास त्याची पडताळणी करण्याचे आवाहन या निमित्ताने केले आहे. अशा प्रकारे बनावट फेसबुक तयार करून पैशाची मागणी अथवा रक्कम लंपास करणाऱ्यांच्या विरोधात चंद्रपूर पोलिसांचा सायबर गुन्हे शाखेने कंबर कसली आहे.

Advertisements
error: Content is protected !!