April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीतांचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही ०४ आरोपीतांसह ३ लक्ष ४१ हजाराचा मुददेमाल हस्तगत

दिनांक १५/११/२०२० रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन भद्रावती परिसरात पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम नामे आनंद विश्वकर्मा हा होंडा अॅक्टीवा गाडीने सुमठाना भद्रावती परिसरात संशयास्पदरित्या फिरत असुन त्याचे जवळ असलेली गाड़ी ही चोरीची आहे. अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ खबरेच्या ठिकाणी पोहचुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता त्या

 

कबुली दिली की, त्याचे ताब्यातील गाडी होडा अॅक्टीवा क. एमएच ३४ बीएम ९६९४ ही त्याने त्याचे साथीदारासह पोलीस स्टेशन वरोरा हददीतुन सन २०१८ मध्ये चोरी केली होती. यावरून सदर आरोपी नामे आनंद विश्वकर्मा या ताब्यात घेवुन त्याची कसुन चौकशी केली असता त्याने आणि त्याचे साथीदाराने या गाडी व्यतीरीक्त चंद्रपुर आणि इतर जिल्हयातुन सुध्दा दुचाकी गाडया चोरी केल्या आहे.

 

सदर आरोपी इसम आणि आणि त्यांचे इतर तिन साथीदार यांचे कडून पोस्टे वरणी येथील १)होंडा अॅक्टीवा, २)होंडा शाईन पोस्टे यवतमाळ येथील ३)बजाज पल्सर, पोस्टे सोनगाव नागपुर येथील ४) बजाज डिस्कवर, पोस्टे रामनगर येथील ५) टिव्हीएस स्कुटीपेप, पोस्टे वरोरा येथील ६) होंडा अॅक्टीवा, आणि ०१ हिरो पॅशन प्रो, ०१ होंडा स्प्लेंडर, ०१ हिरो पैशन प्रो प्लस असे एकुण ०९ दुचाकी किं. ३,४१,०००/-रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर एकुण ४ आरोपी नामे १)गौरव गजानन चितावार वय २१ रा. भद्रावती, ०२) अनिकेत प्रमोद लांडगे वय २३ रा. खांबाळा, ३) आनंद जयप्रकाश विश्वकर्मा वय २५ रा. सुमठाणा भद्रावती, ४) राहुल लक्ष्मण राम वय २१ रा. सुमठाणा भद्रावती यांना पोलीस स्टेशन

 

वरोरा येथे दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर पोलीस निरिक्षक श्री. खाडे यांचे नेतृत्वात सपोनि, जितेंद्र बोबडे, सफी. एंडीत वन्हाटे, पोना मनोज रामटेके, पोना गजानन नागरे, पोशि. विनोद जाधव, पोशि. सुरेंद्र महतो यांनी पार पाडली.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!