April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

पिता पुत्राचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार दोन आरोपीना घुगुस पोलिसांनी केलीअटक

(घुग्गुस ) गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथून एका अल्पवयीन मुलीला घरकाम करण्यासाठी आणून त्या मुलीवर अत्याचार केल्याने मुलीच्या फिर्यादी वरुन कलम ३७६ (२), ३७६ (३), ५०४,५०६ पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी महादेव टिपले(66)व स्वप्नील महादेव टिपले (33)रा.अमराई वॉर्ड,घुग्गुस या दोघांना मंगळवारच्या रात्री दरम्यान त्यांच्या घरून अटक करण्यात आली आहे.महादेवची पत्नी लकवाग्रस्त असल्याने ती एकाच खोलीत राहायची हिच संधी साधून दोन्ही आरोपीनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.ही घटना मुलीने आपल्या आई वडिलांना सांगताच पिडीत मुलीला सोबत घेऊन मंगळवारला घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीच्या तक्रारी वरुन विविध कलमानवये गुन्हे दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार राहुल गांगुर्डे करित आहे.

Advertisements
error: Content is protected !!