April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

घुगुस पोलीस वीरला सुखरूप घरी पोहोचला घुगुस पोलिसाचा सगळीकडे कौतुक केले जात आहे तब्बल बारा तासात आता घरी पोहोचलो वीर ला

घुग्घुस (चंद्रपूर): घुग्घुस येथील प्रख्यात व्यावसायिका सनी खारकर यांचा ८ वर्षांचा मुलगा वीर सनी खारकर हा काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुर्गा माता मंदिर परिसरातून बेपत्ता झाला होता, त्यामुळे त्याचे अपहरण तर झाले नसावे अशी शक्यता बळावली होती त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची तक्रार घुग्घुस पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी व आई वडील नातेवाईक यांनी सर्वत्र शोध घेतला परंतु तो कुठेही मिळाला नाही, रात्रभर वीरचा शोध लागला नाही पण आज सकाळी वीर याला एका पोलीस कर्मचाऱ्यांनी सोनेगाव, नागपूर विमानतळ संकुलात मॉर्निंग वॉक करताना पाहिले हा 8 वर्षाचा मुलगा एकटा असल्यामुळे त्यांनी विचारपूस केली व तत्काळ त्याला जवळच्या सोनेगाव पोलिस स्टेशनमध्ये नेले, वीरचे अपहरण झाल्याची शंका असल्याने अगोदरच त्याचे कुटुंब संकटात सापडले होते व वायरलेस वर सर्व पोलीस स्टेशन ला कळविण्यात आले होते त्यामुळे तब्बल 12 तासानंतर वीर सोनेगाव पोलीस स्टेशन ला सापडल्याने घुग्घुस पोलिसांना कळविण्यात आले खरं तर वीर च्या बेपत्ता झाल्याची बातमी सोशल मीडियावर एवढी व्हायरल झाली की नागपूर ला सुद्धा ती पोहचली, मात्र घुग्घुसहून वीर नागपुरात कसे काय पोहचला हे मात्र गूलदस्त्यात असून पोलिस तपासात त्याचे रहस्य सापडेल अशी शक्यता आहे.

 

विशेष म्हणजे वीर हा बेपत्ता झाला होता त्यावेळेस संपूर्ण सोशल मीडियामध्ये वीर चे फोटो व्हायरल करण्यात आले, मात्र नंतर घुग्घुस पासून दीडशे किलोमीटर दूर नागपूर येथील सोनेगाव परिसरात त्याला सदर व्यक्ती सोडून पळून गेला असल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वीर चे हे खरच अपहरण की कोणी मजाक केली त्याचा तपास पोलिस करीत आहेत . तसंच सोनेगाव वरून एका पोलीस कर्मचारी त्याच्या वडिलांना कर्मचाऱ्याचा मोबाईल घेऊन वीर स्वतःच्या वडिलाला फोन केला तसेच त्याचे वडील सचिन बोरकर यांनी महेश कुंभारे यांना संपर्क केला की माझा मुलगा सोनेगाव पोलीस स्टेशन तर सचिन बोरकर यांनी ज्या फोनवर फोन आला होता त्याच फोनवर रिटन कॉल बॅक केला तो नंबर तिथल्या उपनिरीक्षक यांचा होता यांना तात्काळ कॉल केला की हा मुलगा खरच किती आहे का उपनिरीक्षक हो तोच मुलगा आहे असं उपनिरीक्षक यांनी सचिन बोरकर कर्मचारी ला फोनवर माहिती दिली सांगितला वीर चे वडील आणि घुगुस कर्मचारी सचिन बोरकर आणि महेश कुंभारे आणि घुगुस ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी सचिन बोरकर आणि माहिती दिली सर वीर सोनेगाव पुलिस स्टेशन आहे असे सांगितले तात्काळ सकाळी सहा वाजता नागपुर सोनेगाव येथे वीर आणण्यासाठी रवाना झाले आहे बुधवारच्या सहा वाजता पोलीस ठाण्यातील कर्मचारी सचिन बोरकर ,महेश कुंभारे तसेच वीरचे वडील सनी खारकर यांनी नागपूर येथील सोनेगाव येथे पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन वीर ला ताब्यात घेतलेलेे आहे चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घुगुसची ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी पुढील तपास करीत आहे पोलीस  स्टेशनला आणून वीरची पुन्हा विचारपूस व चौकशी करतील व या प्रकरणाचा कसून तपास करेल अशी माहिती प्राप्त झालेली आहे.

वीर हा 12 घंटे मध्ये भेटून आला याचे श्रेय पोलिसांना तर जातेच मात्र सोशल मीडियावर याचा ज्याप्रकारे प्रसार आणि प्रचार करण्यात आला आणि माहिती सर्वत्र पोहोचली त्यामुळे वीर लवकरात लवकर मिळण्यामध्ये मदत झाली असे संपूर्ण परिसरात चर्चा आहे.

Advertisements
error: Content is protected !!