April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

तब्बल 12 तासांनंतर हरवलेला वीर सापडला, सोनेगाव, नागपूर विमानतळ इथे

घुग्घुस (चंद्रपूर): घुग्घुस येथील प्रख्यात व्यावसायिका सनी खारकर यांचा ८ वर्षांचा मुलगा वीर सनी खारकर हा काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुर्गा माता मंदिर परिसरातून बेपत्ता झाला होता, त्यामुळे त्याचे अपहरण तर झाले नसावे अशी शक्यता बळावली होती त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची तक्रार घुग्घुस पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी व आई वडील नातेवाईक यांनी सर्वत्र शोध घेतला परंतु तो कुठेही मिळाला नाही, रात्रभर वीरचा शोध लागला नाही पण आज सकाळी वीर याला एका पोलीस कर्मचाऱ्यांनी सोनेगाव, नागपूर विमानतळ संकुलात मॉर्निंग वॉक करताना पाहिले हा 8 वर्षाचा मुलगा एकटा असल्यामुळे त्यांनी विचारपूस केली व तत्काळ त्याला जवळच्या सोनेगाव पोलिस स्टेशनमध्ये नेले, वीरचे अपहरण झाल्याची शंका असल्याने अगोदरच त्याचे कुटुंब संकटात सापडले होते व वायरलेस वर सर्व पोलीस स्टेशन ला कळविण्यात आले होते त्यामुळे तब्बल 12 तासानंतर वीर सोनेगाव पोलीस स्टेशन ला सापडल्याने घुग्घुस पोलिसांना कळविण्यात आले खरं तर वीर च्या बेपत्ता झाल्याची बातमी सोशल मीडियावर एवढी व्हायरल झाली की नागपूर ला सुद्धा ती पोहचली, मात्र घुग्घुसहून वीर नागपुरात कसे काय पोहचला हे मात्र गूलदस्त्यात असून पोलिस तपासात त्याचे रहस्य सापडेल अशी शक्यता आहे.

Advertisements
error: Content is protected !!