April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

विवाहित प्रियकराने संशयाने प्रेयसीचा केला खून,

प्रेमाच्या गावात आणि बाराच्या भावात अशी परिस्थिती सद्ध्या सगळीकडे दिसत असून शारीरिक सुखासाठी असलेले प्रेम कधी कुणाच्या जीवावर उठेल हे कळायला मार्ग नाही अशीच एक धक्कादायक घटना चंद्रपूर शहरातील जुनोना चौकात घडली असून मागील दहा वर्षांपासून राकेश ढोले आणि दुर्गा यांच्यात प्रेमसंबंध होते. अशात प्रियकराचे लग्न झाले. त्यानंतरही दोघांत प्रेमसंबंध कायमच होते. मात्र, मागील काही दिवसांपासून दोघांत भांडणे होऊ लागली. त्यामुळे रविवारी सकाळच्या सुमारास प्रियकर हा प्रेयसीच्या घरी गेला. त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या प्रियकराने लाकडी दांड्याने प्रेयसीवर जोरदार प्रहार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी राकेश ढोले या प्रियकराला अटक केली असून दुर्गा उमरे असे मृत प्रेयशी महिलेचे नाव आहे. राकेश ढोले आणि दुर्गा उमरे यांच्यात मागील दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही वर्षांअगोदर राकेशचे एका दुसऱ्या युवतीशी लग्न झाले.
त्यानंतरही दुर्गासोबत त्याचे प्रेम सुरूच होते. परंतु, मागील काही दिवसांपासून दुर्गा आणि राकेश यांच्यात भांडणे होऊ लागली. रविवारी सकाळी दुर्गा हिने राकेशला आपल्या घरी बोलाविले. यावेळी या दोघांत पुन्हा वाद झाला. संतापलेल्या राकेशने लाकडी दांड्याने प्रेयसी दुर्गावर जोरदार प्रहार केला. यात दुर्गाचा जागीच मृत्यू झाला.

प्रेयसीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर राकेशने घटनास्थळावरून पळ काढला. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर रामनगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत राकेश ढोले याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!