
स्टेशन घुग्घुस परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम घुग्घुस येथील सराफा लाईन बाजार मध्ये सोनेचांदीचे दागीने विकी करणाच्या उददेशाने संशयास्पदरित्या फिरत आहे. अशा माहितीवरून स्थागुशा पथकाने घुग्घुस येथील सराफा बाजारात जावुन पाहणी केली असता, मिळालेल्या माहितीप्रमाणे एक इसम संशयास्पदरित्या फिरत असता मिळुन आला. सदर इसमास ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात सोन्याचे दागीने ७०.६ ग्रॅम किं. ३,६०,०६०/-रू आणि चांदीचे दागीने ४१ ग्रॅम किं. २४,६००/-रू असा एकुण ३,६२,५२०/-रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर चोरीच्या मालाबाबत विचारपुस केली असता त्याने काही दिवसापुर्वी पोलीस स्टेशन घुग्घुस हददीत चोरी केली होती आणि याबाबत पोलीस स्टेशन घुग्घुस येथे अप.क २२५/२०२० अन्वये गुन्हा नोंद आहे. यावरून सदर आरोपी नामे रोहीत बुध्दराज कश्यप वय १९ रा. वार्ड क. ३ घुग्युस चंद्रपुर या वरील गुन्हयात अटक करून ताब्यात घेण्यात आले तसेच आरोपी कडुन पोलीस स्टेशन घुग्घुस अप.क, २०७/२०२० कलम ३७९ भादवि मधील बजाज पल्सर दुचाकी किं, ५०,०००/- जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीकडुन गुन्हयातील एकुण ४,१२,५२०/ रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. पुढिल तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपुर . अरविंद साळवे आणि प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा . ओ.जी.कोकाटे यांचे नेतृत्वात सपोनि, बोबडे, पोहवा. संजय आतकुलवार, पोहवा. धनराज करकाडे, पोना. महात्मे, पोशि, रविंद्र पंधरे, गोपाल आतकुलवार, प्रशांत नागोसे, अमोल धंदरे, संदीप मुळे यांनी पार पाडली.
More Stories
मोबाईल बघताना युवकाचा मृत्यू
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाच्या झंझावाताचे यश बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपाला लक्षणीय यश
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाच्या झंझावाताचे यश बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपाला लक्षणीय यश