
दिनांक ०४/०९/२०२० रोजी पोलीस स्टेशन चिमुर हद्दीत स्वामी विवेकानंद आयटीआय महाविद्यालय येथे काही अज्ञात इसमांनी कंम्प्युटर रूम मध्ये प्रवेश करून संगणक, प्रिंटर आणि इतर साहीत्य असा एकुण ५२,०००/-रू चा मुददेमाल चोरून नेला. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन चिमुर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा नोंद होताच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस स्टेशन चिमुर येथील पोलीस पथकाने गोपनीय यंत्रणा कार्यान्वीत करून आणि तपासकौशल्याच्या वापर करून चिमुर येथील तिन इसमांना ताब्यात घेतले. सदर तिन्ही इसमांची गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी कबुली दिली की, दिनांक ०४/०९/२०२० रोजी आयटीआय महाविद्यालय येथे संगणक आणि इतर साहीत्य चोरून नेले होते. यावरून आरोपी इसम
१) सौरभ मनोहर चांदेकर वय २०वर्ष, २) प्रतिक ताराचंद मत्ते वय २१ वर्ष, ३) स्वप्निल रामकृष्ण बंडे वय २३ तिन्ही रा. चिमुर यांना अटक करण्यात आली आहे. सदर तिन्ही इसमांकडुन चोरीच्या गुन्हयातील माल दोन संगणक, तिन प्रिंटर आणि इतर साहीत्य असा एकुण ५२,०००/-रू चा मुदद्माल जप्त करण्यात आला आहे. पुढिल तपास चिमुर पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक . अरविंद साळवे, यांचे मार्गदर्शनात, उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर . नितीन बगाटे यांचे नेतृत्वात पोलीस निरिक्षक स्वप्निल धुळे, पोहवा विलास निमगडे, सचिन खामनकर, सचिन गजभिये, विनायक सुरकंडे, सतिश झिल्पे यांनी पार
More Stories
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन
राज्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन मुख्यमंत्री घेणार निर्णय
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे