April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

भद्रावती डीबी टीमची मोठी कारवाई लाखो रुपयांचा देशी दारूसाठा जप्त

दिनांक १६.१०.२०२० रोजी भद्रावती पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला मुखबीरकडुन बातमी मिळाली की, पुर्णा सेल्स अँड सर्विस,एमआयडिसी रोड,भद्रावती या दुकानात अवैधरित्या देशी दारूचा साठा केलेला आहे. अशा खबरेवरून भद्रावती पोलीसांनी पुर्णा सेल्स अँड सर्विस, एमआयडिसी रोड,भद्रावती दुकानात १८.४५ ते १९.३० वा दरम्यान रेड केली असता ९ प्लास्टिकचे चुंगळयात प्रत्येकी चुंगळीत ३०० निपा प्रत्येकी ९० एम.एल. मापाच्या रॉकेट संत्रा देशी दारूने भरलेल्या सिलबंद एकूण २७०० निपा बॅच नं. ०८५ ऑक्टो २०२० च्या कि.अं. २,७०,००० व २१००० रू चे मोबाईल आरोपी १. अर्जुनसिंग प्रेमसिंग जुनी, वय २४ वर्षे, जात

सिकलकर, रा.वडनेर जि.वर्धा २. अभिजीत पांडुरंग सुरशे, वय ३५ वर्षे, जात : नावी, रा.राजुर कॉलरी, वणी ३.गजानन शंकर गोहने, वय ४२ वर्षे जात : कुणबी रा. श्रीराम नगर,भद्रावती ४. सुंदर रूपचंद वर्मा, वय ४१ वर्ष, जातः ठाकुर, रा.नविन सुमठाणा, भद्रावती असा एकुण २,९१,००० रू चा माल जप्त केला.

तसेच दिनांक १७.१०.२०२० रोजी २.३० ते ३.३० वा दरम्यान भद्रावती पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला मुखबीरकडुन बातमी मिळाली की एक पांढ-या रंगाची वरना गाडी ही नागपूर ते चंद्रपूर रोडने अवैधरित्या दारू वाहतुक करीत आहे

 

अशा खबरेवरून भद्रावती पोलीसांनी भद्रावती टप्पा येथे नाकाबंदी केली असता सदर कार चालकाने पोलीसांची नाकेबंदी पाहुन गाडी एम्टाचे कच्च्या रोडने पलटवुन जात असतांना काही अंतरावर गाडीचा समोरचा डावा टायर फुटल्याने सदर कार चालक हा कार सोडुन पळुन गेल्यावरून वरना गाडी क्र. एम एच ०८ सी ८७०३ ची दारूबाबत पाहनी केली

Advertisements

 

असता गाडीचे डिक्कीत व मधल्या सिटवर २५ खरडयाचे बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्समध्ये १०० नग प्रमाणे प्रत्येकी ९० एम.एल. मापाच्या रॉकेट संत्रा देशी दारूच्या २५०० सिलबंद निपा कि.अं.२,५०,000 रू व ३ खरडयाचे बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्समध्ये २४ नग प्रमाणे प्रत्येकी ५०० एम एल मापाच्या हेयवर्डस ५००० बिअर च्या ७२ सिलबंद कॅन कि.अ.७२०० रू व वाहतुकीस वापरलेली वरना गाडी क्र. एम एच ०८ सी ८७०३ कि.अं.७,००,००० रू असा एकुण ९,५७,२०० रू चा माल जप्त केला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे सा., अपर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे सा.,उप वि.पोलीस अधिकारी निलेश पांडे सा, यांचे मार्गदर्शनात पो.नि. सुनीलसिंग पवार गुन्हे शोध पथकातील पोउपनि अमोल तुळजेवार केशव चिटगीरे, हेमराज प्रधान, निकेश ढेंगे, शशांक बदामवार यांनी केली.

Advertisements
error: Content is protected !!