April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

सय्यद रमजान अली यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती

चंद्रपूर – : महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभाग चे प्रदेश अध्यक्ष एम.एम. शेख यांनी सय्यद रमजान अली यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली आहे. पक्षाध्यक्षा मा.सोनियाजी गांधीजीच्या उच्च आदर्शा नुसार कॉग्रेस पक्षाची वाटचाल सुरु आहे. मा. नदीम जावेद चेअरमन, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग, मा. बाळासाहेब थोरात अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली व सोनियाजीच्या दृष्टीकोनातून समाजाच्या सर्व स्थरातील व विशेषत: तळागळातील शेवटच्या माणसापर्यत काँग्रेस पक्ष पोहचणे आवश्यक आहे व तेच विचार घेवून महाराष्ट्र प्रदेश काग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाचे काम सुरु असल्याने हि एक महत्वाची जबाबदारी सय्यद रमजान अली यांना सोपविण्यात आलेली आहे. सय्यद रमजान अली हे अनेक वर्षापासुन काग्रेस पक्षात सक्रिय रित्या कार्यरत असल्याने व पक्षाशी निष्ठावंत असल्याने त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापुर्वी काग्रेस पक्षाचे अनेक पदावर त्यांनी सक्रिय रित्या कार्य केलेले आहे. सय्यद रमजान अली यांनी आपली नियुक्तीचे क्षेय खासदार बाळुभाऊ धानोरकर, आदर्श मार्गदर्शक नरेशबाबु पुगलिया, जिया पटेल, अब्दुल हमीद, रहेमतुल्ला खान, ओवेस कादरी सह पक्षाच्या अनेक मान्यवरांना दिले असुन सय्यद रमजान अली यांच्या नियुक्ती बद्दल अनेक स्तरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अशी माहिती एका पत्रकान्वये कळविण्यात आलेली आहे.

Advertisements
error: Content is protected !!