April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

हाॅटेल, रेस्टॉरंट चालू करून हाॅटेल कामगारांना रोजगार द्यावा.

भारतीय मजदूर संघाची मागणी करोना महामारी वर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र राज्य शासनाने लाॅकडाऊन घोषीत केलेला होता. त्यामुळे हाॅटेल, रेस्टॉरंट बंद करण्यात आले होते. हाॅटेल मध्ये काम करणारे बहुतांश कामगारांना मधील काळातील संपुर्ण वेतन मिळणे आवश्यक होते. पण वेतन न मिळाल्याने कामगारांना बेरोजगारारीला व ऊपासमारीला सामोरे जावे लागले. त्यामुळे तसेच हाॅटेल ऊद्योगा वर अवलंबून असलेले पुरक व्यवसाय ला ही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ऊद्या. किराणा माल, रिक्षा, टेंपो या मधील कामगार ही रोजगारा पासून वंचित आहेत. शासनाच्या अनलाॅक प्रकिये मुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक, कार्यालय, कंपनी, आस्थापना पूर्ववत चालू झालेल्या आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा मध्ये विविध कामासाठी येणार नागरिकांची वर्दळ वाढलेली आहे. हाॅटेल ऊद्योग बंद असल्याने गरजू ग्राहकांना ही त्रास होत आहे. त्यामुळे भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा वतीने मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्फत दि 29/09/2020 निवेदन देवुन हाॅटेल ऊद्योग त्वरीत चालू करून हाॅटेल कामगारांना रोजगार व मधील काळातील संपुर्ण वेतन मिळावे अशी मागणी केली आहे. या शिष्टमंडळाने मा जयश्री कटारे निवासी जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन दिले या वेळी हाॅटेल कामगार संघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सरचिटणीस सचिन मेंगाळे उपस्थित होते.

Advertisements
error: Content is protected !!