April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

व्याघ्र दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आज दि.१ ऑक्टोबरपासून सुरू

पर्यटकांसाठी अटी व शर्थीवर सुरू करण्यात आले. आज ताडोबा व्याप्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मोहुर्ली गेटवरून आज पहील्या दिवशी २२ जिप्सी सोडण्यात आल्या तर एका जिप्सीमध्ये ६ ऐवजी आता केवळ चारच पर्यटकांना बसण्याची मुभा देण्यात आली. मॉस्क व सॅनिटायझर पर्यटकांना बंधनकारक करण्यात आले आहे. जिप्सीत बसलेल्या सर्व पर्यटकांना आज पहील्या दिवशी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाकडून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सकाळच्या पहिल्या फेरीपूर्वी प्रवेशद्वारावर विधीवत पूजन करण्यात आले व त्यानंतर पर्यटकांसाठी प्रवेशद्वार खोलण्यात आले. गर्भवती महिला, १० वर्षाखालील मुले व ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. जगभरात कोराना महामारीमुळे पर्यटन बंद करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव जगप्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे.येथे देशविदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते तसेच महाराष्ट्रात लॉकडाउन सातत्याने सुरूच असल्याने मागील सहा महिन्यापासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद करण्यात आले. पर्यटन बंद असल्याने मोठे नुकसान झाले मात्र आता पुर्ववत ताडोबा पर्यटन सुरू झाल्याने पर्यटकांमध्ये आंनद व्यक्त होत आहे.

Advertisements
error: Content is protected !!