April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

भद्रावती डीपी टीमची कारवाई 12 लाखाची दारूसाठा जप्त

दिनांक २१.९.२०२० रोजी भद्रावती पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला मुखबीरकडुन बातमी मिळाली की एक सिल्व्हर रंगाच्या टाटा सुमो गाडी ही नागपूर ते चंद्रपूर रोडने अवैधरित्या दारूवाहतुक करीत आहे अशा खबरेवरून भद्रावती पोलीसांनी भद्रावती टप्पा येथे नाकाबंदी केली असता

 

नागपूर हायवे रोडने चंद्रपूर चे दिशेने एक सिल्व्हर रंगाची टाटा सुमो गाडी येतांना दिसली तेव्हा पोलीसांनी तिला थांबण्याचा इशारा केला असता सदर गाडी चालकाने त्याची गाडी दुरवर थांबवून गाडी मधुन उतरुन पळुन गेला व पोलीसांनी सिल्व्हर रंगाची टाटा सुमो एम एच ३१ सी एन १९२५ ची दारूसंबधात पहाणी केली असता गाडीचे डिक्कीत व मधल्या सिटवर ५० खरडयाचे बॉक्समध्ये ९० एम.एल. माराव्या रॉकेट संत्रा देशी दारूच्या ५००० सिलबंद निपा कि. अं. ५,००,००० रु व वाहतुकीस वापरलेली टाटा सुमो विक्टा इक्स गाडी एम एच ३१ सी एन १९२५ कि.अं. ७,००,००० रू असा एकुण १२, ००,००० रू चा जप्त केला.

 

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे सा., अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे सा.,उप वि.पोलीस अधिकारी निलेश पांडे सा, यांचे मार्गदर्शनात पो.नि. सुनीलसिंग पवार ,गुन्हे शोध पथकातील पोउपनि अमोल तुळजेवार केशव चिटगीरे, हेमराज प्रधान, निकेश ढॅगे, शशांक बदामवार यांनी केली.

Advertisements
error: Content is protected !!