April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

पत्नीने केली पतीची हत्या केळझर येथे घटना

चंद्रपूर तालुक्यातील केळझर येथे चारित्र्यावरून संशय घेऊन मारहाण करणाऱ्या पतीला भाऊ व मित्राच्या साहाय्याने यमसदनी पाठविल्याची घटना आज घडली आहे.

सविस्तर माहिती नुसार, केळझर येथील आशिष हरिदास चुनारकर (30) याचे साधारण दहा वर्षांपूर्वी गावातीलच वंदना रायपुरे हिच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आहेत व सुखाचा संसार सुरु होता.

 

परंतु, वर्षभरापासून पती आशिष पत्नीवर संशय घेऊ लागला. संशयावरून आशिष पत्नी वंदनाला सतत मारहाण करू लागला. या सततच्या जाचाला कंटाळून पत्नी माहेरी येऊन राहू लागली. ती आई व भावाकडे वारंवार पतीला संपविण्याचा आग्रह करू लागली.

बहिणीला होणाऱ्या मारहाणी मुळे संतापून भाऊ संदीप रायपुरे व त्याचा मित्र रणदीपसिंह भौन्ड राहणार केळझर याच्या साहाय्याने कट रचला. काल 20 सप्टेंबर रात्री 8 वाजताच्या दरम्यान दोघही आशिष ला फिरून येऊ असे सांगून अजयपूर मार्गाने रेल्वे पुलापर्यंत आले.

Advertisements

लघुशंकेच्या निमित्याने दुचाकी थांबविल्यानंतर संदीप आणि रणधीरसिंग यांनी आशिष याचा गळा दाबून यमसदनी पाठवून पाण्यात बुडून मरण पावल्याचे चित्र दाखविण्यासाठी पाणी साचलेल्या खड्ड्यात फेकून दिले.

 

मात्र गावात सदर प्रकारची चर्चा होताच पोलिसांनी शव ताब्यात घेऊन मर्ग दाखल केला परंतु गावातील काही नागरिकांनी ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवून तपास केला.

तपासाअंती मिळालेल्या पुराव्याच्या आधारे मृतकाचा साळा व त्याच्या मित्राला खुनाच्या कलमा खाली अटक केली असून पत्नीलाही आज ताब्यात घेतले आहे.

 

Advertisements
error: Content is protected !!