April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

एक अनोखी चोरी चंद्रपूरच्या सचिन हॉटेलमधील प्रकार

चोरी केली, पण पैशाला हात नाही लावला, चंद्रपूरच्या सचिन हॉटेलमधील प्रकार, 4 दिवसांच्या जनता कर्फ्युत भुकेल्या चोराची कृती सीसीटीव्हीत कैद, हॉटेलमध्ये केला प्रवेश मात्र केवळ पोटभर जेवून खिशात भरून नेले पदार्थ, गल्ला उघडून रक्कम मोजून ठेवली जागेवर, हॉटेकचालकाने देखील पोलिस तक्रार टाळली

 

चोरी केली, पण पैशाला हात लावला नाही असा प्रकार चंद्रपुरात बघायला मिळाला आहे. चंद्रपूरच्या सचिन हॉटेलमधील प्रकाराने संचारबंदीतील वास्तव पुढे आणले आहे. ४ दिवसांच्या जनता कर्फ्युत भुकेल्या चोराची कृती सीसीटीव्हीत कैद, झाली आहे. चोराने हॉटेलमध्ये प्रवेश केला मात्र केवळ पोटभर जेवून, खिशात पदार्थ भरून नेले. त्याने गल्ला उघडून रक्कम मोजून जागेवर ठेवली. त्याची प्रामाणिकता पाहून हॉटेलचालकाने देखील पोलिस तक्रार टाळली.

कोरोना संकटाने गोरगरिबांचे खाण्याचे कसे वांधे केले, याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना चंद्रपुरात घडली. पैशाचे बंडल हाती लागले असतानाही चोराने ते जसेच्या तसे ठेवले आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि गरिबांच्या भुकेचा आणि प्रमाणिकतेचाही प्रत्यय आला. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर हॉटेल सचिन आहे. लोकवस्तीपासून थोडे दूर आहे, पण अगदी हायवेवर आहे. याच हॉटेलमध्ये घडलेली ही घटना आहे. चंद्रपुरात 10 तारखेपासून जनता कर्फ्यु लागू करण्यात आला. त्यामुळं जनजीवन ठप्प झाले होते. दुकाने, हॉटेल्स, रोजगार सारे काही बंद होते. हातावर आणून पानावर खाणाऱ्या लोकांची यामुळे मोठी अडचण झाली. रोजगार नाही, त्यामुळे पैसे नाहीत. मग खायचे काय, असा प्रश्न एका युवकाला पडला आणि शेवटचा उपाय म्हणून त्याने अन्न पदार्थांची चोरी करण्याचे ठरवले. 10 सप्टेंबरच्या रात्री हा युवक हॉटल सचिनमध्ये घुसला. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या या चोराने आधी फ्रिजमधून पाण्याची बॉटल काढली आणि मनसोक्त पाणी प्यायला. ती बॉटल परत फ्रीजमध्ये ठेवली.

त्यानंतर त्याने खाद्य पदार्थाकडे मोर्चा वळवला. हाती जे लागेल ते त्याने आरामात खाल्ले, काही खिशात भरले. कदाचित तो घरच्या लोकांसाठी नेत असावा. नंतर मालकाच्या खुर्चीवर जाऊन बसला. टेबलाचे रकाने उघडून बघितले. त्यात त्याला मोठी रक्कम दिसली. मात्र ही रक्कम त्याने जशीच्यातशी ठेवली आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी हॉटेल मालकाने हे फुटेज बघितले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यांनी लगेच पैसे तपासले, ते तसेच ठेवलेले दिसले. केवळ भुकेपोटी या युवकाने हे कृत्य केले, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलीस तक्रारही केली नाही.

Advertisements

वरवर बघता ही चोरीची घटना वाटत असली, तरी त्यामागे कोरोना संकटाने गरिबांची केलेली दैना आणि परिस्थितीचे वास्तव स्पष्ट झाले आहे.

Advertisements
error: Content is protected !!