
दिनांक १२/०९/२०२० रोजी स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकास गोपणीय माहीती मिळाली की, पोस्टे चिमुर हद्दीतील ग्राम नेरी येथील इसमाने त्याचे घरात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेले सुगंधी तंबाखू व तत्सम पदार्थाची अवैध साठवणुक केली असुन त्याची विक्री करणार आहे. अशा माहीती वरून स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने पोस्टे चिमुर हद्दीतील ग्राम नेरी येथे पोहोचुन गुलाब कामडी यांचे दुकानामागील घराची मिळालेल्या माहीतीच्या आधारे झडती घेतली असता घरामध्ये मजा १०८ हुक्का तंबाखू ५० ग्रॅमचे – १७० डब्बे, २०० ग्रॅमचे-२०४ डब्बे, इगल हुक्का तंबाकू ४० ग्रॅमच्या-२५९५ पाउच व २०० ग्रॅम च्या-१०४८ पाउच असा एकुण १०,९६,३००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन चिमुर येथे अपराध नं. ३३९/२०२० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर डॉ..महेश्वर रेडडी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर पोलीस निरिक्षक . ओ.जी. कोकाटे यांचे नेतृत्वात पोउपनि विकास मुंढे, पोउपनि सचिन गदादे, पोशी जावेद, पोशी अपर्णा व चापोशि ढाकणे यांनी पार पाडली.
More Stories
स्टंटबाजी करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या रामनगर पोलिसांनी दोन आरोपीला घेतलं ताब्यात
1 फेब्रुवारीपासून दुचाकीवर हेल्मेटचा वापर अनिवार्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकरी अजय गुल्हाने यांचे आदेश
सरपंच पदाचे आरक्षण 29 व 30 जानेवारीला