
चंद्रपुर शहराबरोबरच दुर्गापुर , उर्जानगर, पडोली व बल्लारशा शहरामध्ये कोरोना रूण दिवसेदिवस वाढत असुन मागील काही दिवसात चंद्रपुर जिल्हयात एकुण ४,३८६ नागरीक कोरोना बाधीत होवुन त्यामधील ५१ कोरोना बाधीतांचा मृत्यु झालेला आहे. चंद्रपुर जिल्हयात होत असलेली रूग्ण वाढ ही अत्यंत चितांजनक असुन रूग्णवाढ रोखण्याकरीता जनता संपर्क साखळी तोडणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हा प्रशासनाने दिनांक १०/०९/२०२० ते १३/०९/२०२० असे एकुण चार दिवस जनता कफ्फ्यु पाळण्याचे आवाहन केले आहे. कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने व संपुर्ण बाजारपेठ सुरू आहे यामुळे नागरीकांचा एकमेकांना संपर्क होवुन आणखी कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जनता कफ्फु दरम्यान चंद्रपुर शहर, दुर्गापुर, उर्जानगर, पडोली आणि बल्लारशा येथील सर्व नागरीकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडु नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
जनता कफ््यु दरम्यान खालील नमुद सेवा बंद व सुरू राहतील,
बंद – सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ दुकाने, पान ठेले, चहा टप-या, फुटपाथवरील दुकाने हे सर्व बंद राहतील.
सर – दुध वितरण सेवा, सर्व रूग्णालय, औषधीचे दुकाने, पार्सल सुविधा, पेट्रोल पंप, वर्तमानपत्रे वितरण, शासकीय कार्यालय, बँक, एमआयडीसी, वेकोली व वेळेवर उद्भवणारे आक्रमक बाबी (Unforeseen Emergency) ह्या बाबी वगळुन इतर सर्वप्रकारचे दुकाने/आस्थापना स्वयंफुर्तीन नागरीकांनी बंद ठेवावेत. जनता कफ्फ्यु नागरीकांनी स्वतःहुन पाळयचा असुन यशस्वी करण्याकरीता त्याबरोबरच रूग्णांची वाढणारी संख्या रोखण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. यापुर्वी सुध्दा प्रशासनाकडुन वेळोवेळी सुचना देण्यात आलेल्या आहेत परंतु काही नागरीक सुचनांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे पुढील ४ दिवस आपल्या घरातच राहुन जनता कफ््यु पाळणे हे आपले व आपल्या टुंबाच्या हिताचे असल्याने कर्फ्यू पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
More Stories
भद्रावतीकरांच्या स्वागताने भारावून गेलो, संवाद साधण्याकरीता पुन्हा नक्की येईन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भावोद् गार
गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
भद्रावती शहरातील एक दारु चकना फ्री अवैध दारू विक्रेत्यांन मध्ये स्पर्धा सुरू आहे.