April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

वाहतूक पोलीस मारहाण चार आरोपी अटकेत भद्रावती शहरातील घटना

वाहतूक शिपाई मानोरा येथील फाट्याजवळ वाहन तपासणी करता उभे असता वरोरा मार्गाने भद्रावती कडे चार चाकी वाहन भरधाव वेगाने येत असल्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता या वाहनातील चौघांनी वाहतूक शिपायास मारहाण केल्याची घटना काल सायंकाळी दरम्यान घडली याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली

यातील आकाश सुरज आत्राम वय 19 वर्ष ,विकी राजू गुरले वय 27 वर्ष राहणार दुर्गापुर, श्रीकांत मारुती खिरडकर वय 3O वर्ष , दिनेश महादेव उपरे वय 25 वर्ष राहणार वरोरा असे आरोपींची नावे असून हे सायंकाळ दरम्यान वरोरा मार्गे भद्रावती कडे भरधाव वेगाने येत असताना मानोरा फाट्याजवळ वाहतूक पोलीसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला परंतु ते तिथे न थांबता पेट्रोल पंप चौकात थांबले त्यांचे मागून वाहतूक पोलीस प्रकाश शेंदरे व शंकर पुप्पलवार हे त्या ठिकाणी आले त्यांनी वाहन चालकाला वाहन का थांबविले नाही याबाबत विचारणा केली असता त्यांनी तुम्ही कोण मला विचारणारे असे म्हणून वाहनातील चौघांनीही शेंदरे यांना मारहाण केली या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना होताच ते घटनास्थळी दाखल झाले वाहतूक पोलीस शेंदरे यांच्या तक्रारीवरून यातील चारही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे . पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे

Advertisements
error: Content is protected !!