April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

रामनगर पोलिसांनी साठ लाखाच्या जवळपास दारू केली नष्ट !

रामनगर पोलिस व एक्साईज विभागाची संयुक्त कारवाई !
आज रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी रामनगर पोलीस व एक्साईज विभागाने 29 गुन्ह्यांमध्ये पकडलेली देशी-विदेशी दारुचा साठा अंदाजे किंमत जवळपास 60 लाख रुपये नष्ट केला. रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षातील ही चौथी कारवाई आहे.
सविस्तर वृत्त असे की जिल्ह्यात दारूबंदी नंतर अवैध दारूची विक्री खुलेआम सुरू आहे. रोज पकडण्यात येणारी लाखो रुपयाची दारू ही काही दिवसानंतर नष्ट केल्या जाते. नेहमीच्या कारवाईचा भाग म्हणून आज रामनगर पोलीस व एक्साईज विभागाने 29 गुनह्यामधील जवळपास साठ लाखाची देशी-विदेशी दारू दाताळा रोड येथील म्हाडा कॉलनीत गड्ठा करून नष्ट करण्यात आली. संपूर्ण दारूचा साठा याठिकाणी जाळण्यात आला. रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हाके साहेब यांनी याविषयी माहिती देताना देशी-विदेशी स्वरूपाची ही दारू जाळण्यात आली असून ही ही या वर्षातील चौथी कारवाई असून 29 गुन्ह्यांमधील दारूच्या साठा नष्ट करण्यात आल्याचे सांगितले आहे.
दारूबंदी नंतर जिल्ह्यामध्ये हायवे दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे पकडण्यात येणारी दारू ही ठेवायची कुठे हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा टाकला आहे. तसेच दारू वर कारवाई केल्यानंतर पकडण्यात येणारा मुद्देमाल ही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. दारूबंदी संदर्भात पोलिसांची कारवाई ही प्रशंसनीय असून आज नष्ट करण्यात आलेला दारूसाठा हा रामनगर पोलीस व एक्साईज विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईच्या परिणाम आहे

Advertisements
error: Content is protected !!