April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही चोरी घरफोडी करणाऱ्या तिन आरोपींना अटक

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन रामनगर येथील दाखल अप क. ८२६/ २०२० कलम ४५७,४५४,३८० भादंविच्या गुन्हयातील तिन आरोपी इसम हे गांधी चौक परिसरात संशयास्पदरित्या फिरत आहे. अशा माहितीवरून स्थागुशा पथकाने सापळा रचुन गांधी चौक परिसरातुन त्या तिन्ही इसमांना ताब्यात घेतले. तिन्ही इसमाची विचारपुस करून झडती घेतली असता त्यांचे ताब्यात अप क. ८२६/२०२० या गुन्हयातील चोरीचा माल मिळुन आल्याने आरोपी नामे १)करण उर्फ ताला मुन्ना समुद वय २४ रा. पंचशील चौक घुटकाला वार्ड चंद्रपुर, २)अतुल विकास राणा वय २३ रा. शामनगर बंगाली कॅम्प चंद्रपुर, ३)सुमोहित चंद्रशेखर मेश्राम वय २२ रा. अष्टभुजा वार्ड चंद्रपुर यांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपीतांकडुन गुन्हयातील सोन्याचे दागीने ३८.७२ ग्रॅम किं. २,१०,०००/- रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर डॉ . महेश्वर रेडडी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक . ओ.जी. कोकाटे यांचे नेतृत्वात पोउपनि, , सचिन गदादे, सफौ. पद्माकर भोयर, पोहवा. सुरेश केमेकर, पोना, अमजद खान, अनूप डांगी, पोशि, सतिन वाघमारे, मिलिंद जांभुळे, दिनेश अराडे यांनी पार पाडली.

Advertisements
error: Content is protected !!