
दिनांक २६/०८/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस पथक चंद्रपुर शहर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील दुचाकी चोरी करणारा गुन्हेगार आरोपी इसम नामे प्रशांत करमरकर हा आपल्या ताब्यात एक विना नंबरची दुचाकी घेवुन आझाद बगीचा जवळ संशयास्पदरित्या फिरत आहे. अशा माहितीवरून स्थागुशा पथकाने आझाद बगीच्या जवळ जावुन चौकशी केली असता, आरोपी प्रशांत करमरकर हा आपल्या ताब्यात एक दुचाकी घेवुन मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन दुचाकी बाबत विचारपुस केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने त्यास ताब्यात घेवुन कसुन चौकशी केली असता त्याने कबुली दिली की, सदर दुचाकी ही काही दिवसापुर्वी समाधी वाई चंद्रपुर येथुन चोरी केली होती. आणि या व्यतीरिक्त त्याने यापुर्वीही आणखी दुचाकी चोरी केल्याचे कबुली दिल्याने त्याने सांगीतल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहुन एकुण ०८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. यामध्ये ६ हिरोहोंडा स्प्लेंडर आणि २ पॅशन प्रो असा एकुण ३,२०,०००/-रू किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आले आहे. यावरून पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अप.क. ६४६/ २०२० कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर डॉ. महेश्वर रेडड़ी
यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक . ओ.जी. कोकाटे यांचे
नेतृत्वात सपोनि, जितेंद्र बोबडे, पोहवा. धनराज फरकाडे, पोशि. रविंद्र पंधरे,
गोपाल आकुलवार, प्रशांत नागोसे, अमोल खंदारे यांनी पार पाडली.
More Stories
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन
राज्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन मुख्यमंत्री घेणार निर्णय
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे