April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

आर्थिक गुन्हे शाखेची कार्यवाही सीडीसीसी बँकेतील पैशाची अफरातफर करणाऱ्या ०३ आरोपीतांना अटक

फिर्यादी नामे रविंद्र श्रीनिवास शिदे वय ४२ रा. बाजार वार्ड भद्रावती जि. चंद्रपुर संचालक सिडिसीसी बँक चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे दिनांक १०/०८/२०२० रोजी रिपोर्ट दिली की, सेक्सी बँकेचे अध्यक्ष मनोहर लक्ष्मणराव पाउनकर व मेसर्स माई एंटरप्रायजेस चंद्रपुर चे प्रोपरायटर विनोद रतन गिरी आणि सचिन मनोहर साळवे यांनी संगणमत करून माई फर्मच्या नावाने बेकायदेशिररित्या गैरमार्गाचा अवलंब करून बँकेला दजैदार वस्तु न पुरविता कमी किंमतीच्या वस्तुची अधीक किंमत लावुन तसेच वार्षिक देखभाल नावाचे खाली कामे देवुन बँकेन्या रक्कमेची अफरातफर करून ७.३०,७७,७५०/- रू वी बँकेची फसवणुक केली आहे. अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अप क. ७६७/२०२० कलम ४२०४०९,३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर डॉ.श्री. महेश्वर रेडडी यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्र के मकेश्वर हे करीत असुन सदर गुन्हयात सखोल तपासासाठी सिडिसिसी बँकेकडुन आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अफरातफर करण्यात आलेले दस्तऐवज प्राप्त करण्यात केले त्यावरून आरोपी नामे १) मनोहर लक्ष्मणराव पाउनकर वय ५५ वर्ष, २) सचिन मनोहरराव साळवे वय ३२ रा. लक्ष्मीनगर वार्ड चंद्रपुर, ३) विनोद रतन गिरी वय ५१ रा. विठठ्ल यांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीताना मा. न्यायालयापुढे हजर करण्यात आले असुन आरोपीतांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे. पुढिल तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर करीत आहे.

 

Advertisements
error: Content is protected !!