April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

मूल- गडचिरोली राष्टीय महामार्गाचे काम कासवगतीने- रस्त्याच्या कामाला गती वाढविण्याचीआम आदमी पार्टीची मागणी

गडचिरोली ते मूल सुरू असलेल्या राष्टीय महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे.याचा मोठा फटका या मार्गावरून धावणा-या वाहनचालकांना बसला आहे.हा महामार्ग एक प्रकारे डोकेदुखीच ठरल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. मागील ब-याच वर्षापासून या राष्टीय महामार्गाचे काम सुरू आहे.महामार्गासाठी करोडो रूपयांचा खर्च केल्या जात आहे. महामार्गाच्या बांधकामासाठी पाहिजे तसी गती मिळत नसल्याचा आरोप होत आहे. शासनाचे आणि संबधीत राष्टीय महामार्ग विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. महामार्गासाठी ठिकठिकाणी खोदून ठेवले असल्याने पावसाळयात याठिकाणी मोठया प्रमाणात चिखल होत असून इतर वेळेस वाहनचालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. राष्टीय महामार्गाच्या कामाला गती देण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे मूल तालुका अध्यक्ष अमित राउत आणि चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष गौरव श्यामकुळे यांनी दिला आहे.

Advertisements
error: Content is protected !!