
चंद्रपूर, दि. 12 ऑगस्ट : कोरोना संसर्ग काळामध्ये जिल्हा प्रशासन आणि सामान्य जनता यातील विश्वासाचे नाते आणखी घट्ट करण्याची जबाबदारी पुढील काळात आपल्या सर्वांवर आहे. जनतेने अतिशय संयमाने, संयत भूमिकेने या काळात प्रशासनाला साथ दिली आहे. कोरोना पुढील काळात आणखी वाढू शकतो. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेने आणखी सतर्कतेने जनतेच्या सेवेमध्ये वाहून घ्यावे, असे आवाहन मावळते जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज डॉ.कुणाल खेमनार यांचा भावपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील आणखी एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे प्रस्तावित निरोप समारंभ नियोजन भवन ऐवजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉलमध्ये घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, महसूल यंत्रणेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, वेगवेगळ्या विभागाचे विभाग प्रमुख, पोलिस विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आजचा हा भावपूर्ण निरोप समारंभ पार पडला.
निरोपाला उत्तर देताना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गेली दोन वर्ष चंद्रपूरकरांची सेवा करताना वेळ कसा गेला कळलेच नसल्याचे सांगितले. लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर कोरोना संक्रमण काळाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या कसोटीवर काम करण्याची या काळात संधी मिळाली. चंद्रपूरच्या जनतेची प्रचंड साथ या काळात जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार व कायद्याप्रमाणे एक टीम बनवून काम केले. त्याचप्रमाणे जनतेने देखील प्रत्येक नव्या भूमिकेचे स्वागत करून उत्तम प्रतिसा
More Stories
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कोविड योद्ध्यांचे उद्या ‘भिक मागो’ आंदोलन
राजू कुकडे यांचेवर खासदार बाळू धानोरकर समर्थक गुंडानी केलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन.
भद्रावती पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याची दारू, जुगार, सट्टा व सुगंधीत तंबाखू धंदेवाईकांकडून लाखोंची हप्ता वसुली?