
काल अचानक चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची बदली करण्यात आली.शासनाने केलेल्या या बदलीच्या विरोधात जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोळ्यावर पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी हे पेशाने डॉक्टर आहेत.मागील चार महिन्यापासून covid-19 आपत्तीचे अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करीत आहेत.कोविडची आपत्ती आल्यानंतर तीन महिन्यापर्यंत चंद्रपुरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला नाही यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या नियोजनाचं व त्यांच्या नेतृत्वात चतुर्थश्रेणी कर्मचारी ते अधिकारी व कंत्राटी कामगार या सर्वांच्या टीमने अतिशय चांगले काम केलेले आहे. जिल्हाधिकारी यांना चंद्रपुरात केवळ दोन वर्ष झाले. प्रामाणिक व होतकरू अधिकारी असलेले डाॅ.खेमनार यांनी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक सामान्य माणसाची कैफियत ऐकून घेणे, नियमात बसत असेल तर तातडीने न्याय देणे ही त्यांची पद्धत अनेकांना भावलेली आहे. आजपावेतो जिल्हाधिकारी यांच्याविरोधात सामान्य जनता किंवा राजकीय पक्ष अथवा सामाजिक संघटना कोणीही त्यांच्याविरोधात तक्रार केली नाही.सर्व स्तरातून त्यांना सहकार्य करण्यात आलेले आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये covid-19 च्या व्यवस्थापनाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून याचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ होत आहे. मात्र त्यांची अचानक बदली केल्यामुळे covid-19 आपत्तीचे व्यवस्थापन कोसळण्याची शक्यता असून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचा हा प्रकार
More Stories
प्रशासनावरील सामान्य जनतेचा विश्वास घट्ट ठेवा: डॉ. कुणाल खेमनार
स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही आरोपीकडुन एक विदेशी पिस्टल आणि गुप्ती हस्तगत
श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची कचराळा शेतीस भेट !