April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची कचराळा शेतीस भेट !

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येथील श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषि कार्य अनुभव या अभ्यासक्रमाची ची विद्यार्थिनी मीनल विनोद ताजणे या विद्यार्थीनीने चंद्रपूर जिल्ह्यातील कचराळा येथील शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन शेतीविषयक विविध प्रकारची माहिती जाणून घेतली व शेतकऱ्यांना शेती बद्दल अडी-अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी शेतकऱ्यांना शेती विषयक तण व्यवस्थापन कंपोस्ट भाजिपाला पिकाचे खत व्यवस्थापन इत्यादी बाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर लिंबोळी अर्क बनविण्याची प्रक्रिया व व त्याचे महत्त्व याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी कृषी महाविद्यालयातील प्राचार्य राम खर्चे सर, प्राध्यापक चांदुरकर सर तसेच समन्वयक प्राध्यापक वैभव इंगळे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक गणांची उपस्थिती होती व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्य पूर्ण पडले.

Advertisements
error: Content is protected !!