April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी केली अटक

तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना रामनगर पोलीसानी अटक केली
आहे.आज दिनांक 2/8/20 रोजी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संजय नगर एम ई एल कंपनी रोड चंद्रपूर परीसरात येथे एक इसम हातात तलवार घेऊन फिरत आहे अशा माहितीवरून संजय नगर स्नेह मंच समोर रोड चंद्रपूर येथे पेट्रोलिंग दरम्यान आरोपी नामे बरकत सिंग दारासिंग डांगी वय 30 वर्ष रा. इंदिरानगर चंद्रपुर व मुन्ना रामू जाधव वय 19 वर्ष राहणार संजय नगर चंद्रपुर हे आपले ताब्यातील सुपर स्प्लेंडर मो.सा.क्र.एम एच ३४ए डि 2178 या मोटरसायकलवर बसून हातात बेकायदेशीररीत्या तलवार घेऊन फिरत असता मिळून आले त्यांचे ताब्यातून व अंगझडतीत खालीलप्रमाणे मुद़देमाल बेकायदेशीररीत्या बाळगुन मिळुन आल्याने अप क्र.736 /2020 कलम 4,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
नग तलवार किं अं 3000/-रू
गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल किं अं 35,०००/-रू
नग मोबाईल संच कि.अं 5000रू
नगदी रक्कम 11,240रू असा एकुण ,54,240/-रू चा मुद़देमाल हस्तगत करण्यात आला.ही कारवाई पोलीस निरीक्षक हाके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभुदास माहुलीकर, संतोष दरेकर,गजानन डोईफोडे शंकर येरमे, रामभाऊ राठोड,पोशी माजीद खा पठाण,पोशी निलेश मुडे यांनी केली आहे

Advertisements
error: Content is protected !!