April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

ग्रंथालये वाचण्याकरता सुरु करा : डॉ. पियुष मेश्राम चंद्रपूर,

लोकडॉनच्या काळात काही महिन्यापासून ग्रंथालय बंद आहे येणाऱ्या महिन्यात एम. पि.एस. सी. सरळ सेवा भरती इत्यादी परिक्षा होऊ घातल्या आहे. अशा परिस्थितीत गरिब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या टाळेबंदी सर्व ग्रंथालय,वाचण्याकरता रुम बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमके करायचे काय असा प्रश्न उपस्थित झाला असून याबाबत चे निवेदन मा. तहसिलदार यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी यांना

देण्यात आले. ज्या प्रमाणे हॉटेल्सला व भाजी मार्केट व मटन मार्केट चिकन मार्केट व मच्छी मार्केट सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत परवानगी देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ग्रंथालयांना व लायब्ररी सुद्धा कठोर नियम ठेवून सुरु करण्याची मागणी बॅरिस्टर

राजाभाऊ खोबरागडे वाचनालयाचे सहसचिव डॉ. पियुष मेश्राम यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. यावेळी सुमित बनकर अमर मुल्लेवार कार्तिक शेंदरे, अनिकेत शेंडे आदी उपस्थित होते.

Advertisements
error: Content is protected !!