April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

लॉकडाउन दरम्यान चंद्रपुर पोलीसाची ऑल आऊट ऑपरेशन १०२४ केसेस दाखल, २ लाख रुपये दंड वसुल

चंद्रपुर शहरात लॉकडाउन असतांना नागरीकांनी सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करुन मास्क वापरणेबाबत आदेश पारित झाले आहेत. आदेशाचे उल्लंघन होवु नये या करिता प्रशासनाकडुन वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. परंतु उल्लंघन करणार्या इसमांवर आज रोजी चंद्रपुर पोलीस दलातर्फे ऑल आऊट ऑपरेशन राबवुन कार्यवाही करण्यात आली आहे.

दिनांक २४ जुलै २०२० रोजी नागरिकांनी आदेशाचे उल्लनक करणान्या इसमावर ज्या मध्ये मास्क न वापरने व सोशल डिस्टेन्सिंगचे नियम न पाळणान्या इसमांवर कार्यवाही करण्यात आली असुन या मध्ये मास्क न वापरणान्या इसमाविरुध्द ७४५ केसेस दाखल करण्यात आल्या असुन १.४८.१००/-रु दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे

पालन न करणान्यांविरूध्द ५४ केसेस दाखल करण्यात आल्या असुन १२,२००/-रु दंड वसुल करण्यात आला असुन तसेच इतर हेड खाली २२५ केसेस करुन ४६,७००/-रु दंड वसुल करण्यात आला असुन अश्या एकुण १०२४ केसेस करण्यात आल्या व एकुण २.०७,०००/-रू दंड वसुल करण्यात आला आहे.

चंद्रपूर पोलीस दलातर्फे आज पासुन विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली असुन यापुढे कोणीही नियमाचे पालन करणार नाही त्याचेविरुध्द कठोर कार्यवाही करण्यात येईल. दंडात्मक कार्यवाही झाल्यानंतरही कोणी पुन्हा नियमाचे पालन न केल्यास अश्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात येईल.

Advertisements

तरी, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, चंद्रपूर जिल्हयात कोरोना (Covid- 19) विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाद्वारे निर्गमित केलेल्या संचारबंदी आदेशाचे पालन तसेच मास्क व सोशल डिस्टेन्सिंगचे नागरीकांनी काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

Advertisements
error: Content is protected !!