April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

वीज देयक माफ, शेतकर्‍यांच्या हितासाठी भाजपा रस्त्यावर चंद्रपूर, 17 जुलै

टाळेबंदी काळातील वीज देयक माफ करावे, शेतकर्‍यांचे कर्ज माफ करावे, खतांचा पुरवठा करावा, रमाई आवास योजनेचे अनुदान द्यावे, राजगृहातील हल्लेखोरांवर कडक कार्यवाही करावी, यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी भाजपा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील 341 ठिकाणी राज्य सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. गोरगरीब जनता, शेतकर्‍यांच्या हितासाठी भाजपासह सामान्य जनता रस्त्यांवर उतरली. राज्य सरकार विरोधात तीव्र रोष व्यक्त केला.

हे आंदोलन राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर, आ. किर्तीकुमार भांगडिया, चंदनसिंह चंदेल, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूर नगर परिषदेचे नगरध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार संजय धोटे, अतुल देशकर, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, संजय गजपूरे, यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

आ. घुग्घुस येथील गांधी चौकात देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज देयकांची होळी करण्यात आली. पोंभूर्णा येथे भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सभापती अलका आत्राम, नगराध्यक्ष श्‍वेता वनकर, ज्योजी बुरांडे, जिवती तालुक्यात केशव गिरमाजी, महेश देवकते, दत्ता राठोड, चंद्रपूर तालुक्यात नामदेव डाहुले, विवेक बोंढे, संतोषकुमार द्विवेदी, ब्रिजभूषण पाझारे, अनिल डोंगरे, मूल तालुक्यात पंचायत समिती सभापती चंदू मारगोनवार, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, पूजा डोहणे, कोरपना

तालुक्यात नारायण हिवरकर, सतिश उपलंचीवार, निलेश ताजणे, नुतन जिवणे, राजुरा तालुक्यात माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, सुनिल उरकुडे, वाघू गेडाम, गोंडपिपरी तालुक्यात बबन निकोडे, निलेश संगमवार, संजय झाडे, दिपक सातपुते, चिचपल्लीमध्ये रामपाल सिंग, हनुमान काकडे, गौतम निमगडे, मूल

Advertisements

 

शहरात भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे, बल्लारपूर ग्रामीणमध्ये किशोर पंदिलवार, रमेश पिपरे, इंदिरा गेडाम, वैशाली बुद्धलवार, सावली तालुक्यात अविनाश पाल, संतोष तंगडपल्लीार, आशीष कार्लेकर, सिंदेवाहीत जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नागराज गेडाम, हितेश सुचक, रितेश अलमस्त, नागभीड तालुक्यात गणेश तर्वेकर, आवेश पठाण, संतोष रडके, चिमूरमध्ये डॉ. श्याम हटवादे, ब्रम्हपुरी तालुक्यात अतुल देशकर, रामलाल दोनाडकर, क्रिष्णा सहारे, वरोड्यात अहेतेश्याम अली, बाब भागडे, भद्रावतीमध्ये नरेंद्र जिवतोडे, तर बल्लारपूर शहरात चंदनसिंह चंदेल, हरीश शर्मा, काशी सिंग, रेणुका दुधे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.मागण्यांचे निवेदन तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. मागण्यांची पूर्तता न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाने दिला आहे.

Advertisements
error: Content is protected !!