April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

पोलीसांसोबत पोलीस योध्दा म्हणुन सहकार्य करण्याचे चंद्रपुर पोलीस दलातर्फे आवाहन

महाराष्ट्र राज्यांतर्गत तसेच चंद्रपूर जिल्हयात कोरोना विषाणुचा (कोविड-१९) प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असुन पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी हे आपले कर्तव्य बजावीत असताना त्यांचेवर गुन्हयांचा तपास, बंदोबस्त, नाकाबंदी कॅन्टेंटमेंट झोन बंदोबस्त, कोविड केअर सेंन्टर बंदोबस्त, हॉस्पीटल येथील बंदोबस्त, बाहेर राज्यातुन व जिल्हयातुन आलेले प्रवासी यांची तपासणी सेंटर येथील बंदोबस्त व पोलीस डयुटीचा ताण आधीच असताना जिल्हयातील कोरोना बाधीत व त्याचा संपर्कात आलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष दयावे लागत आहे

. तसेच स्वतःच्या कुटुंबाची सुध्दा जबाबदारी पार पाडत आहे. या सर्व बाबींचा विचार करता पोलीसांना सर्वसामान्य जनतेकडुन विशेषतः युवकांकडुन सहकार्य करण्याची गरज आहे.

याच बाबीच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयातील युवा पिढीला पोलीसांसोबत काम करुन त्यांच्यासारखे जीवनात कायदा व नियमाचे पालन करुन जीवन जगावे यासाठी “पोलीस योध्दा” हा एक अभिनव उपक्रम राबविण्याची योजना आहे. सदर योजने अंतर्गत समाजातील युवकांना पोलीसांबरोबर निःस्वार्थपणे १५ दिवसांकरीता “पोलीस योध्दा” म्हणुन सेवा बजावुन पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सदर “पोलीस योध्दा”

तरुणांना चंद्रपूर जिल्हा पोलीसांकडुन त्यांनी बजाविलेल्या अमुल्य योगदानाबद्दल सन्मान प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात येईल.

Advertisements

आवाहन :- सामाजिक कार्यात रुची असणाऱ्या व पोलीसांच्या कार्यात मदत करु इच्छिणाच्या युवकांना चंद्रपूर पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, कोरोनासारख्या गंभीर आपत्तीत पुढे येवुन पोलीस दलांच्या खांदयाशी खांदा लावुन पोलीसांसोबत कर्तव्य बजावुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाची भुमिका बजवावी.

पोलीस व जनता हे एका येवून काम केल्यास निश्चितच सर्वत्र झपाटयाने वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास यश मिळेल.

खालील लिंकवर आवश्यक माहिती भरुन जास्तीत जास्त संख्येनी “पोलीस योद्धा” उपक्रमात सहभागी व्हा.

https://forms.gle/SNJa2iPytqPLrkrn9

Advertisements
error: Content is protected !!