April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

मोठ्या भावाने केले लहान भावाची हत्या दुर्गापुर मधली घटना मैत्रिणीची छेड काढल्याच्या रागातून केली हत्या

चंद्रपुरच्या दुर्गापूर परिसरातील अनिकेत रामटेकेच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा,  सख्ख्या मोठ्या भावानेच केली लहान भावाची हत्या, मैत्रिणीची छेड काढल्याच्या रागातून केली हत्या

हत्या करून पुरल्यावर शवाचा वास येतो आणि हा वास लपविण्यासाठी आरोपीने एक कुत्रा मारून त्या ठिकाणी फेकला, मात्र पावसामुळे माती वाहून गेली आणि मृतदेह उघडा पडला,  त्यामुळेच या हत्या प्रकरणाला फुटली वाचा

टीव्हीवरील गुन्हे विषयक मालिका आणि फिल्मी पद्धतीने गुन्हे करण्याचे करण्याच्या योजना सतत बघुन एका भावाने आपल्या 17 वर्षीय सख्ख्या लहान भावाचा निर्घृण खून करून शव फिल्मी स्टाईलने पुरल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहराजवळच्या दुर्गापूर परिसरात उजेडात आली.

दुर्गापूरच्या वेताळ चौक भागात वास्तव्याला असलेल्या या रामटेके कुटुंबातील 2 सख्ख्या भावांची कहाणी दुर्दैवी आणि फिल्मी स्टाईल हत्येचा नमुना ठरली आहे. रामटेके कुटुंब वास्तव्याला असलेल्या भागातील सत्यवान रामटेके यांच्या पडक्या घरात दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी स्थानिक पोलिस ठाण्याला दिली. जमिनीवर  कवेलू पसरून असलेल्या एका विशिष्ट ठिकाणी जमिनीतून एक मानवी हात बाहेर आला असल्याची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिस ठाणेदार खोब्रागडे व डीपी इन्चार्ज पोउपनि प्रविन सोनोने व दुर्गापूर पुलिस टीम ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

Advertisements

यानंतर तहसीलदारांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत हा खड्डा पुन्हा एकदा खणण्यात आला. यात या भागात 10 ते 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अनिकेत विपुल रामटेके या 17 वर्षीय मुलाचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गुप्त सूचना काढून या हत्येमागे कोण असावे याचा कयास बांधला. तेव्हा रामटेके यांच्या घरातील २१ वर्षीय मोठा मुलगा अंकित बेपत्ता असल्याचे उघड झाले. एकीकडे अनिकेत बेपत्ता असल्याची पोलिसात असलेली तक्रार आणि दुसरीकडे पुरलेला मृतदेह काढताच बेपत्ता झालेला सख्खा मोठा भाऊ यात पोलिसांनी कनेक्शन स्थापित केले.रामटेके कुटुंबात असलेल्या आईला मात्र यापैकी कशाची माहिती नव्हती.

खबऱ्यांचे जाळे विणून लपून बसलेल्या अंकित रामटेके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या कबुलीजबाबात आपणच आपल्या सख्ख्या लहान भावाचा खून केल्याची माहिती त्याने दिली. टीव्ही वाहिन्यांवरील गुन्हे विषयक मालिका बघून या खुनाचा कट रचण्यात आला. आपल्या प्रेयसीची छेड काढली म्हणून सख्ख्या भावाचा काटा काढण्याचे अंकितने ठरवले.

त्यानुसार सत्यवान रामटेके यांच्या सत्‍यवान रामटेके यांच्या पडक्या घरातच आरोपीने सख्ख्या भावाला दारू पाजण्यात आली.  आणि त्याचा गळा आवळून खून करत प्रेत पुरण्यात आले. प्रेत लवकर कुजावे यासाठी युरिया आणि इतर साहित्य देखील या खड्ड्यात टाकण्यात आले होते. एवढेच नव्हे तर आरोपी अंकीत याने एक कुत्रा मारून तोही याच घटनास्थळी फेकला. ज्यामुळे दुर्गंधीविषयी लोकांची दिशाभूल झाली.

मात्र मुसळधार पावसाने 15 दिवसांनी हा बनाव उजेडात आलाच. पोलिसांना घटनास्थळी शव कुजण्यासाठी आवश्यक साहित्यासह डांबर गोळ्याही आढळून आले आहेत. हा खड्डा मृतक आणि आरोपी यांनी मिळून अवैध दारू विक्रीसाठीच्या बाटल्या लपवण्यासाठी खोदून तयार केला असल्याचाही खुलासा आरोपीने केला आहे.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून 24 तासात या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सतत टीव्ही वरील गुन्हे विषयक मालिका बघून आपल्या सख्ख्या भावाची हत्या करण्याचे हे प्रकरण धक्कादायक ठरले आहे. .
सदर कार्यवाही पुलीस उपविभागीय अधिकारी शिलंवत नांदेडकर ठाणेदार खोब्रागडे याचे मार्गदर्शनाखाली सहा निरीक्षक मानकर, उपनिरीक्षक प्रविन सोनोने व आदींनी केली

Advertisements
error: Content is protected !!