April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध दारू तस्करी विरुद्ध कार्यवाही १० लक्ष रूपये किंमतीचा मुदद्देमाल हस्तगत

 

दिनांक ०८/०७/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, अंचलेश्वर वार्ड परिसरात एक महिन्द्रा कंपनीची पिकअप गाडी मध्ये दारु लपवुन ठेवण्यात आलेली आहे. अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचुन छापा टाकला असता मिळालेल्या माहितीप्रमाणे एक महीन्द्रा पिकअप गाडी दिसुन आली. सदर ठिकाणी गाडीचा चालक दिसुन आला नाही. गाडीमध्ये प्लॉस्टीकचे करेट व त्यामध्ये दारु असल्याचा संशय असल्याने पथकाने सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये दारु दिसु नये या करिता भाजीपाला ठेवण्यात येणारे ७० रिकामे प्लॉस्टीक करेट व त्या मधोमध पोत्यांमध्ये ९० एमएल नी भरलेल्या २८०० बॉटल देशी दारु किमंत ३,०१,०००/-रु चा मुद्येमाल मिळुन आला. सदर दारूचा माल व वाहन बीबी एकुण

७,००,०००/-रू असा १०,०१,०००/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे नोंद करण्यात आला असुन आरोपीचा शोध सुरु आहे.

सदरची कामगिरी गुन्हयाचा पोलीस अधीक्षक  महेश्वर रेडडी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक  ओ.जी. कोकाटे यांचे नेतृत्वात पोउपनि. सचिन गदादे, सफौ. पदमाकर भोयर, पोना. प्रकाश बल्की, अमजद खॉन, पोशि. सतिश बघमारे, मिलींद जांभुळे, नितीन रायपुरे यांनी पार पाडली.

Advertisements
error: Content is protected !!