April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

प्रेयसीचा पाठलाग करणाऱ्या प्रियकराविरोधात रामनगर पोलिसात तक्रार दाखल

पवनप्रीत सिंग याची शास्त्रीनगर वॉर्डातील मुलीसोबत इन्स्ट्राग्रामवरून ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. यातून दोघे एकमेकांना भेटू लागले. मात्र, हा प्रकार किती दिवस सुरू ठेवायचे म्हणून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघे एकत्र राहू लागले. काही दिवस आनंदात गेले.

मात्र, काही कारणातून दोघांत खटके उडू लागली. सतत होणाèया वादाला कंटाळून दोघांनी वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही आईवडीलांकडे राहू लागले.

अशात मुलगी ही शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने घराकडे जात असताना पवनप्रीत qसग हा तिचा पाठलाग करीत होता. बंगाली कॅम्प परिसरात तिचे वाहन अडवून तिला मोबाईलमधील अश्लील छायाचित्रे दाखविली. सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली.

मुलीने घरी जाऊन वडीलाला या प्रकाराची माहिती दिली. वडिलासोबत पोलिस ठाणे गाठून पवनप्रीतqसग भाटिया याच्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!