April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

एका अट्टल चोराला शहर पोलिसांनी केली अटक 

आरोपी प्रतीक उर्फ राहुल धनराज झाडे हा वेकोली कर्मचारी म्हणून कार्यरत होता. नोकरी गमावल्यावर तो पुन्हा चोरी करायला लागला. त्याच्यावर चोरी तसेच तसेच इतर गुन्हेगारीचे प्रकरणे त्याच्या नावावर आहेत. नागपूर तसेच चंद्रपूर जिल्ह्यात याची नोंद आहे. त्याने नागपूर, चंद्रपूर येथून अनेक दुचाकी चोरल्या. काही दिवसांपूर्वी त्याने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात एका महिलेची पर्स चोरली. ज्यात मोबाईल, आणि इतर महत्वाची कागदपत्रे होती. याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. तपासात हा आरोपी प्रतीक झाडे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या परिसरात पोलिसांनी पाळत ठेवली. आज प्रतीक पुन्हा याच ठिकाणी चोरी करायला आला असता पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. अधिक तपास केला असता त्याने चार दुचाकी आणि मोबाईल चोरल्याचे समोर आले. त्यानुसार हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात  आल्या सदर कार्यवाही पुलीस उपविभागीय अधिकारी शिलंवत नांदेडकर पोलीस निरीक्षक बाहादुरे याचे मार्गदर्शनाखाली सहा. बाबा डोमकावळे, शरीफ शेख, महेंद्र बोरकर, स्वामी दास चालेकर, विलास निकोडे, किशोर तुमराम, वंदिराम पाल, सिध्दार्थ रंगारी नापोको सतिश टोगलकर रामकिसन सानप, पांडुरंग वाघमोडे, पंकज शिदे जितेंद्र चुनारकर पोशि. सचिन बुटले. प्रमोद डोगरे, मंगेश गायकवाड महीला पोलीस शिपाई रिना राडे यानी केली.

Advertisements
error: Content is protected !!