April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

रामनगर पोलिसांनी सायकल चोट्याला रंगात केली अटक

पोलीस स्टेशन रामनगर मध्ये सायकल चोरीचे प्रमाण जास्त झाले असल्याने मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी रामनगर पोलीसाना आरोपीचा शोध घेणेकामी आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन रामनगर पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी तात्काळ तपासाची चके फिरवुन पथक तयार केले

अनुषंगाने पोलीस स्टेशन रामनगर हद्दीमधुन सन २०१९ व २०२० या मधील चोरीस गेलेल्या सायकलचे गुन्हयाचा छडा लावण्यास गुन्हे शोध पथकास यश आले असुन आरोपी अब्दुल हमीद शेख रा. भद्रावती यास अटक करुन रामनगर पोलीस ठाणेकडील तब्बल आठ सायकल रुपये किमंत ५०,०००/-रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असुन रामनगर पोलीस ठाण्याचे एकुण सहा गुन्हे उघडकीस आणण्यास रामनगर पोलीसाना यश आले आहे.

सदरच्या गुन्हयाचा उलगडा मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक . प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी

शिलवंत नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांचा नेतृत्वात सपोनी संतोष दरेकर, सफौ प्रभुदास माहुलीकर, पोहवा आंनद परचाके, पोहवा. गजानन डोहीफोडे, नाका शंकर येरमे, नापोका रामभाऊ राठोड, पोशि निलेश मुळे, माजीद पठाण यांनी केला आहे.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!