April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

कोरोना लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या गरजवंतांना नगरसेवक अजय सरकार यांच्या वतीने ५०० नागरिकांना किटचे वाटप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंत, कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून कोरोना लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या गरजवंतांना नगरसेवक अजय सरकार यांनी मदतीचा हात देत ५०० नागरिकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले आहे.लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील स्थलांतरित कामगार, गरजवंत, हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत अन्न धान्य वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे. संचारबंदी असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही, लहान व्यवसाय करणारे कारागीर व दुकानदार यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना घरीच बसून राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांची उपासमार होऊ नये, त्यांना पोटभर अन्न ऊपलब्ध व्हावे या हेतूने नगरसेवक अजय सरकार यांनी मदतीचा हात देत ५०० नागरिकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले आहे.

Advertisements
error: Content is protected !!