April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत हरवलेल्या एकुण २७ लाख ३६ हजार रुपये किंमतीच एकण १२२७ नग ला मोबाईलचा शोध व वाटप कार्यक्रम

चंद्रपूर जिल्हयात मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे मार्गदर्शनात जिल्हयातील

विविध पोलीस स्टेशन अंतर्गत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल संदर्भात ट्रेसींग/शोध मोहिम राबवुन एकुण २५ लाख ३६ हजार रुपये किंमतीच्या एकुण १२२५ नग मोबाईल/स्मार्टफोन ट्रेस/शोध घेवून त्यापैकी २१४ नग मोबाईल हस्तगत करण्यास सायबर पोलीस ठाणे ला यश प्राप्त झाले आहे.

आजच्या आधुनिक जिवनात मोबाईल/स्मार्टफोन हे दैनंदिन जिवनाचे अविभाज्य व जिवनावश्यक निकडीची वस्तु झालेली आहे. मोबाईल विना जगणे लोकांना कठीण झालेले आहे. त्यातच जर एखाद्या इसमाचा मोबाईल हरवला किंवा चोरीस गेला तर तो इसम अस्वस्थ होत आहे, कारण मोबाईल मध्ये संबंधीत व्यक्तींचे बॅक डिटेल, बॅक व्यवहार संबंधीत ऑनलाईन पेमेंट गेटवे अॅप जसे गुगल पे, फोन पे, पे टी एम शिवाय अनेक ऑनलाईन पेमेंट गेटवे अॅप इंस्टाल असतात. तसेच सदर मोबाईल मध्ये वापरकर्त्यांचे नातेवाईकांचे कॉन्टेक्ट नंबर, एसएमएस आणि वैयक्तिक पारिवारीक फोटो/व्हिडीओ सह खाजगी माहिती संकलीत असते. त्यामुळे मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यावर त्याचा दुरुपयोग होवून मोबाईलच्या किंमती पेक्षा दहा पटीने पैश्याचा, खाजगी माहितीचा नुकसान होण्याची शक्यता असते.

सायबर गुन्हेगारांकडून बरेच वेळा अशाच हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल मधील डाटा चा उपयोग करुन अनेक सायबर गुन्हे घडत आहेत. त्यामुळे अशा सायबर गुन्हयांना आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी त्याची दखल घेवून सायबर पोलिस ठाणे मार्फतीने अशा हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल/स्मार्टफोन ट्रेसींग/शोध मोहिम राबवुन एकुण १२२५ नग मोबाईल ट्रेस करुन २१४ नग मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. त्यापैकी १६७ मोबाईल हे जिल्हयातील स्थानिक पोलीस ठाणेच्या मदतीने हस्तगत करण्यात आले असुन ४४ मोबाईल संबंधीत तक्रारदारांना परत करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत सन २०१९ मध्ये २१२५ नग हरवलेले मोबाईल/स्मार्टफोन पैकी १२२५ नग मोबाईल/ स्मार्टफोन हे चंद्रपूर जिल्हा व्यतीरिक्त वर्धा, यवतमाल, नागपूर, भंडारा, गोंदिया अमरावती, अकोला, बुलढाना, पुणे, कोल्हापुर, मुंबई सह तेलंगाना, कर्नाटक, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगाल अशा ठिकाणी वापरत असल्याचे देस झालेले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या २१४ नग मोबाईल/स्मार्टफोन हे बहुतांश शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे मिळुन आले आहे. त्यांना याबाबत विचारपुस केली असता काहींना ते रस्त्यात सापडले तर काहींनी ओएलएक्स व अनोळशी व्यक्तीकडून कमी पैश्यात खरेदी केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.सध्या सर्वत्र कोरोना (Covid-19) विषाणु चा प्रादुर्भाव वाढलेला असल्यामुळे विविध जिल्हयात, राज्यात ट्रेस एकुण १२२५ मोबाईल/स्मार्टफोन पैकी २१४ नग मोबाईल/स्मार्टफोन हस्तगत करण्यात आले आहे. उर्वरीत ट्रेस झालेले मोबाईल हस्तगत करण्यासाठी संबंधीत व्यक्ती, संबंधीत पोलीस ठाणे अधिकारी यांचेशी संपर्क व समन्वय साधुन त्या मोबाईल सुध्दा हस्तगत करण्याची कार्यवाही सुरु आहे.

Advertisements

हस्तगत झालेल्या मोबाईल पैकी काही मोबाईल आज दिनांक १ जूलै, २०२० रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथील “मंथन” हॉल मध्ये वाटप करण्यात येत आहे.

मा. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी नागरीकांना या निमित्त आवाहन केले की, कोणत्याही व्यक्तीचे मोबाईल/स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास विचलीत न होता, सर्वप्रथम त्याबाबत जवळील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. सदर तक्रारीचे अनुषंगाने त्याचे वापरात असलेले सिम क्रमांक त्वरीत बंद करुन त्याच नंबरचे नविन सिम कार्ड अॅक्टीव करुन घ्यावे. तसेच मोबाईल/स्मार्टफोन मध्ये असलेला प्ले स्टोर मध्ये सेव्ह केलेला जी मेल आयडी व पासवर्ड च्या सहायाने गुगलच्या My Activity अॅप्लीकेशनच्या मदतीने मॅप करावा. तसेच भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण Telecom Regulatory Authority of चे अधिकृत वेबसाईट https://ceir.gov.in वर हरवलेल्या मोबाईल च्या आय.एम.ई.आय. क्रमांक व मोबाईल क्रमांक पंजीबध्द करुन मोबाईल चे आयएमईआय ब्लॉक करुन घ्यावे.

सर्वांनी हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे की, मोबाईल च्या किंमती पेक्षा आपला वैयक्तिक डाटा हा अनेक पटीने जास्त किंमतीव महत्वाचा आहे.रे

Advertisements
error: Content is protected !!