
गंजवार्ड भाजी मार्केट हे चंद्रपूर शहरातील सर्वात जास्त जुने व प्रख्यात भाजी मार्केट आहे. 1988 ला या भाजी मार्केट ची स्थापना झाली. चंद्रपूर शहरातील सर्व भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करिता नागरिक गंज वार्डात गर्दी करतात. इतर मार्केट पेक्षा स्वस्त व कमी दरात ताजा भाजीपाला शहरातील नागरिकांना मिळतो.होलसेल व किरकोळ दरात भाजीपाला उपलब्ध असतो. देशात कोरणा covid-19 ची सात पसरू नये म्हणून मार्च महिन्यात संपूर्ण देश लोक डाऊन करण्यात आला. त्यामुळे गंजवार्ड भाजी मार्केट देखील बंद करण्यात आले. लॉकडाउन चा फायदा घेत मनपा प्रशासनाने लोकडाऊन काळातच संपूर्ण गंजवार्ड भाजी मार्केट ची नव्याने बैठक व्यवस्था करण्याचे काम सुरू केले व 32 वर्ष जुनी भाजी विक्रेत्यांची बैठक व्यवस्था जेसीबी व अतिक्रमण दस्त्याच्या हाताने उध्वस्त केली. हे करत असताना मनपा प्रशासनाने एकाही जुन्या भाजीविक्रेत्यांना विश्वासात घेतले नाही. भाजी विक्रेत्यांनी विचारणा केली असता आम्ही तुम्हाला जागा देऊ आम्हाला आखणी करू द्या एवढेच अधिकाऱ्यांकडून भाजी विक्रेत्यांना सांगण्यात आले. जागा वाटप कशी होणार,केव्हा होणार, किती होणार कुणाला होणार आदी काहीच सांगण्यात आले नाही.
मनपाच्या या भोंगळ कारभाराची तक्रार भाजी विक्रेत्यांनी मनसे नगरसेवक सचिन भोयर यांच्याकडे केली. त्यानंतर सचिन भोयर यांनी गंजवार्ड भाजी मार्केट ला प्रत्यक्ष भेट दिली. गंजवार्ड भाजी मार्केट मधील नव्याने आखण्यात आलेल्या बैठक व्यवस्थेची पाहणी केली.सर्व भाजी विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या या भेटीदरम्यान अनेक गोष्टी उघडकीस आल्या. गंजवार्ड मार्केट अध्यक्ष यांनी मनपा प्रशासनास सादर केलेल्या यादीत घोळ असल्याचे जुन्या भाजी विक्रेत्यांनी सांगितले.मार्केट मधिल गाळेधारकांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांची नावे देखील या यादीत टाकण्यात आले. नातेवाईक जवळचे मर्जीतील लोक अगदी चार सहा महिन्यापूर्वी व्यवसाय सुरू केलेल्या लोकांना देखील अध्यक्षाच्या यादीत स्थान देण्यात आले. 32 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना अध्यक्ष यांनी विश्वासात घेतले नाही. माननीय महापौर व माननीय आयुक्त यांना खोटी यादी देत अंधारात ठेवले.
मनपा प्रशासनाने आखलेली 4 ×5 आणि 4×7 ही जागा भाजी विक्रीसाठी अपुरी आहे. भाजीविक्रेते तेवढ्या जागेवर माल, तराजू, बैठक करू शकणार नाही. मनपाने 32 वर्षे जुन्या बैठक व्यवस्थेत बदल केल्यास त्याचा परिणाम हा भाजी विक्रेत्यांच्या व्यवसायावर होणार. तसेच कुठलीही सुविधा न देता प्रति दिन 50 रुपये शुल्क म्हणजे महिन्याला 1500 व वर्षाला 17800 रुपये हे अपुऱ्या जागेचे खूप जास्त होणार. 32 वर्षे जुन्या भाजी विक्रेत्यांना डावलून विश्वासात न घेता मनपा प्रशासनान ईश्वर चिठ्ठीने दुकान वाटप करणार होते. कोरोना लॉकडाउनच्या काळात जिथे मार्केट बंद आहे अशा वेळेस भाजी विक्रेत्यांकडून फिक्स डिपॉझिट रक्कम मनपा प्रशासन घेणार होती.
भाजी विक्रेत्यांच्या या समस्येबाबत मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी सर्व भाजी विक्रेत्यांना सोबत घेत माननीय महापौर व माननीय आयुक्त यांची भेट घेत भाजी विक्रेत्यांच्या सर्व समस्या व अडचणी त्यांना सांगण्यात आल्या व त्यांना विविध मागणीचे निवेदन देण्यात आले त्यात प्रामुख्याने 32 वर्षे जुन्या भाजीविक्रेत्यांची वयाच्या पुराव्यानुसार ओळख परेड करण्यात यावी.भाजीविक्रेत्यांची बैठक व्यवस्था सुधारावी परंतु भाजी विक्रेत्यांच्या 32 वर्षे जुन्या जागेत बदल करू नये. भाजी विक्रीस सोयीस्कर होईल एवढी जागा 5×10 फूट जागा प्रत्येक भाजीविक्रेत्यास द्यावी. भाजी विक्रेत्यांना परवडेल येवढेच शुल्क प्रतिदिन आकारण्यात यावे आदी सर्व मागण्या करण्यात आल्या. यावेळी गंजवार्ड कमिटीचे उपाध्यक्ष भाऊराव चन्ने, सल्लागार पराग घडसे तसेच सर्व भाजी विक्रेते उपस्थित होते.
More Stories
प्रशासनावरील सामान्य जनतेचा विश्वास घट्ट ठेवा: डॉ. कुणाल खेमनार
जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीविरोधात जन विकास सेनेचे आंदोलन उद्यापासून सर्वपक्षीय आंदोलन करणार
स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही आरोपीकडुन एक विदेशी पिस्टल आणि गुप्ती हस्तगत